उर्फी जावेदला शिवीगाळ, थेट मिया खलीफाशी तुलना…, अभिनेत्रीने शो अर्धवट सोडला

कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मिडिया सेन्सेशन उर्फी जावेदने त्याच्या शोमधील स्पर्धकावर आपला अपमान केल्याचा आरोप केला आहे.

उर्फी जावेदला शिवीगाळ, थेट मिया खलीफाशी तुलना..., अभिनेत्रीने शो अर्धवट सोडला
urfi javed
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 5:22 PM

कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मिडिया सेन्सेशन उर्फी जावेदने त्याच्या शोमधील स्पर्धकावर आपला अपमान केल्याचा आरोप केला आहे. आपल्याला शोमध्ये अपमानास्पद वागणूक मिळ्याचं तीने म्हटले आहे.तसेच तीने हा शो देखील मध्येच सोडला.शो सोडल्यानंतर आपण असं का केलं? याचं स्पष्टीकरण देखील उर्फीने दिलं आहे. तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमधून तीने आपला संताप व्यक्त केला आहे.

उर्फी जावेदने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ती ज्या शोमध्ये सहभागी झाली होती,तीथे तीची तुलना एडल्ट फिल्म स्टार मिया खलीफा सोबत करण्यात आली. सर्वांसमोर मला बदनाम करण्यात आलं. आपण किती कूल आहोत हे दाखवण्यासाठी असे लोक दुसऱ्यांना बदनाम करतात. आजकाल लोक व्ह्यूज मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. एखाद्याला शिवीगाळ करणं किंवा बदनाम करणं हे आजकाल अनेकांना खूप कूल वाटतं.

पण मला माफ करा माझ्या शरीरावरून किंवा माझी इतरांशी तुलना करून जर कोणी माझा अपमान करत असेल तर ते मी सहन नाही करू शकणार, हे सर्व फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी केलं जातं.ज्या व्यक्तीनं मला शिवी दिली, तो व्यक्ती विनोदाच्या मूडमध्ये तर बिलकूल नव्हता. तो व्यक्ती अपंग असल्याचा दिखावा करत होता, मी त्याला विचारलं तू असं का? करत आहेस तर त्याने मला शिव्या दिल्या असा आरोप उर्फी जावेदने केला आहे.

पुढे बोलताना ती म्हणाली की त्याच्या शेजारचा जो व्यक्ती होता तो कूल बनण्याचा प्रयत्न करत होता, त्याने माझी तुलना मिया खलीफासोबत केली.मला खूप वाईट वाटलं.मला अशा व्यक्तींवर बिलकूल बोलण्याची इच्छा नव्हती, मात्र मी खूप व्यथीत झाल्याचं तीने म्हटलं आहे. तसेच समय रैना हा माझा चांगला मित्र आहे, या घटनेसाठी मी त्याला जबाबदार ठरवू शकत नाही असंही तीने म्हटलं आहे.

मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.