मुंबई: शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मतोंडकर ( Urmila Matondkar) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: ट्विटरवरुन कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीव सर्वांनी काळजी घेत सण साजरा करावा, असंही त्या म्हणाल्या.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी बरी असून स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे. सध्या होम क्वारंटाईन असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.
I’ve tested positive for #COVID19
I’m fine n have isolated myself in home quarantine. Requesting everyone who came in contact with me to get tested immediately.
Also humbly request all you lovely people to take care of yourselves during the Diwali festivities ??— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) October 31, 2021
उर्मिला मातोंडकर यांनी दिवाळीमध्ये सर्व नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, अशी विनंती करत असल्याचं म्हटलं आहे.
Maharashtra News LIVE Update | शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण, ट्विट करत माहिती@UrmilaMatondkar pic.twitter.com/B9iHxCNz3F
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2021
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील काही दिवसांपूर्वी दुसऱ्यादा कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. कोरोना विषाणू संसर्ग संपला नसल्यानं नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणं आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं,असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील कोरोना झाला होता. राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
इतर बातम्या:
परमबीर सिंह कुठे गायब झाले? पोलिस आणि सरकारला पडलेल्या प्रश्नांचं संजय निरुपमांनी दिलं उत्तर!
VIDEO: मी आंबेडकरवादी, जयभीमवाला; ज्ञानदेव वानखेडेंनी पत्रकार परिषदेतच दाखवलं जातीचं सर्टिफिकेट
Urmila Matondkar tested corona positive now she isolated herself in home quarantine