Birth Anniversary | काँग्रेस सरकारने उत्पल दत्त यांना पाठवलेले तुरुंगात! वाचा काय होते या मागचे कारण…
मनोरंजन विश्वाचा सुवर्णकाळ अर्थात 70-80च्या दशकात हिंदी भाषिक प्रेक्षक अभिनेते उत्पल दत्त (Utpal Dutt) यांना त्यांच्या विनोदी आणि खलनायकाच्या पात्रांबद्दल अधिक ओळखू लागले होते.
मुंबई : मनोरंजन विश्वाचा सुवर्णकाळ अर्थात 70-80च्या दशकात हिंदी भाषिक प्रेक्षक अभिनेते उत्पल दत्त (Utpal Dutt) यांना त्यांच्या विनोदी आणि खलनायकाच्या पात्रांबद्दल अधिक ओळखू लागले होते. उत्पल दत्त हे भारतीय मनोरंजन विश्वातील असे नाव होते, ज्यांनी प्रत्येकाला आपल्या अभिनयाने प्रभावित केले. प्रत्येक पात्रात स्वतःला चपखल बसवणे, हा जणू त्यांच्यासाठी ‘बाये हात का खेळ’ होता. उत्पल दत्त यांचा जन्म 29 मार्च 1929 रोजी बारीसालमध्ये झाला होता, जो प्रदेश आता बांगलादेशात स्थित आहे (Utpal Dutt Birth Anniversary special story when actor jailed by congress government).
बंगालमधील उत्पल दत्त यांचे नाव आजही तेवढेच प्रसिद्ध आहे जितके 70-80च्या दशकात होते. जेव्हा ते बंगालमधील थिएटरमध्ये काम करत होते, तेव्हापासूनच त्यांच्या अभिनयाची चर्चा होती. त्याचवेळी हिंदी चित्रपटातील उत्पल दत्त यांच्या कारकिर्दीविषयी बोलायचे, तर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले, परंतु हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘गोलमाल’ या चित्रपटामुळे त्यांना मिळालेली ओळख आणि प्रतिष्ठा अजूनही अबाधित आहे. आज उत्पल दत्त यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित वादग्रस्त किस्से सांगणार आहोत, ज्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारची अक्षरशः झोप उडाली होती.
नाटकांच्या वादग्रस्तमुळे बर्याचदा झाली तुरुंगवारी!
हा तो काळ होता जेव्हा उत्पल दत्त बंगालमधील थिएटरचा एक महत्त्वाचा भाग असायचे. ते आपल्या नाटकांमधून आपले मत बेधडकपणे व्यक्त करत असत. मग ते मत समाजाविषयी असो की, सरकारविषयी… असे म्हणतात की, उत्पल दत्त कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीचे होते. त्यांनी सरकार आणि त्यांच्या धोरणांविरूद्ध अनेक नाटकांची कहाणी लिहिली आणि नंतर ती रंगमंचावर सादर देखील केली (Utpal Dutt Birth Anniversary special story when actor jailed by congress government).
त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. उत्पल दत्त यांनी काँग्रेस सरकारविरूद्ध अनेक नाटकं लिहिली आणि सादर देखील केली. तथापि, सरकारविरूद्धची उत्पल दत्त यांची ही कलाकृती काँग्रेस सरकारच्या पचनी पडली नाही. त्यांच्याविरोधात कोणीही आवाज उठवावा, अशी तत्कालीन काँग्रेस सरकारची इच्छा नव्हती. अशा परिस्थितीत उत्पल दत्त यांचे सरकारवर निशाणा साधणारे नाटकं काँग्रेसच्या पचनी पडले नव्हते. सरकार विरोधी नाटकांमुळे उत्पल दत्त यांना काँग्रेसने अनेकदा तुरूंगात धाडले होते.
तुरुंगातही लेखणी सुरूच!
मात्र, तुरुंगातदेखील उत्पल दत्त यांच्या लेखणीला कोणीही रोखू शकले नाही. तुरूंगात राहून देखील त्यांनी बरीच नाटकं लिहिली आणि जेव्हा ते तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा त्यांनी ही नाटकं रंगमंचावर मोठ्या धामधुमीत सादर केली. उत्पल दत्त यांनी ही नाटके त्यांच्या लिटिल थिएटर ग्रुपच्या माध्यमातून रंगवली. उत्पल दत्त यांनी बंगाली नाटकांबरोबरच अनेक बंगाली चित्रपटांमध्येही काम केले. हिंदी मनोरंजन विश्वापेक्षा बंगाली मनोरंजन विश्वात त्यांचे नाव प्रचंड गाजले.
(Utpal Dutt Birth Anniversary special story when actor jailed by congress government)
हेही वाचा :
Holi 2021 | मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल, पाहायला मिळणार नात्यांचे बदलते रंग!
चहा शौकीन सारा पोहोचली ‘सैफ चायवाला’ स्टॉलवर, छोट्या नवाबसाठी शेअर केला खास मेसेज!
PHOTO | ‘गाढवाचं लग्न’मधील ‘गंगी’ आता कशी दिसते?#RajashreeLandge | #Gangi | #GadhvacheLagna | #Entertainment | #PhotoOfTheDay https://t.co/K00Ik5tTmg
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 28, 2021