Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vamika | विराट-अनुष्काच्या नेमप्लेटवर आता ‘वामिका’चंही नाव, पाहा हा क्युट Photo

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून पडद्यापासून दूर असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात आहे. अलीकडेच अनुष्का शर्माने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Vamika | विराट-अनुष्काच्या नेमप्लेटवर आता ‘वामिका’चंही नाव, पाहा हा क्युट Photo
अनुष्का - विराट
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 2:10 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून पडद्यापासून दूर असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात आहे. अलीकडेच अनुष्का शर्माने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिने आपल्या लेकीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होता. विरुष्काने आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ (Vamika) ठेवले आहे. अभिनेत्रीने मार्चमध्ये वामिकाचा दोन महिन्यांचा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांना अद्याप त्यांच्या लेकीचा पूर्ण चेहरा पाहता आलेला नाही, पण आता वामिका विषयी एक बातमी चर्चेत आली आहे (Vamika Name added on virat anushka nameplate photo goes viral on internet).

अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 जानेवारीला आई झाली. गरोदरपणात तिने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 1 फेब्रुवारीला अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या मुलीच्या जन्मानंतर पहिले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते आणि तिचे नाव चाहत्यांना सांगितले होते. आता विरुष्काच्या घराची नेमप्लेट चर्चेत आली आहे.

अनुष्का-विराटची नेम प्लेट

Vamika

वामिका

सध्या विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत, भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये खेळाडूंना घरासारखे वातावरण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी नेमप्लेटसह खोलीचे नंबरही बदलले आहेत. झूमच्या अहवालानुसार, कॅप्टन विराटच्या खोलीबाहेर एक खास नेमप्लेटव लावण्यात आली आहे. ज्यात विराट, त्याची पत्नी-अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि त्यांची दोन महिन्यांची लेक  वामिका अशी तीन नावे आहेत.

सोशल मीडियावर त्याचा एक फोटोही चर्चेत आला आहे. या नेमप्लेटवर ‘वामिका’चे नाव देखील नाव लिहिलेले आहे. हा फोटो सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडे अभिनेत्रीने वामिकाच्या दुसर्‍या महिन्याच्या वाढदिवसाच्या केकचा फोटो शेअर केला होता (Vamika Name added on virat anushka nameplate photo goes viral on internet).

अनुष्काने शेअर केला स्टायलिश फोटो

(Vamika Name added on virat anushka nameplate photo goes viral on internet)

रविवारी अनुष्काने मुलगी झाल्यानंतर आपला पहिला ग्लॅमरस फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अभिनेत्री खूप फिट दिसत आहे. अनुष्का पूर्वीसारखी तंदुरुस्त आणि सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय

अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.

(Vamika Name added on virat anushka nameplate photo goes viral on internet)

हेही वाचा :

Video | आधी टकीला शॉट, मग नशेतच केला शृंगार, ‘या’ अभिनेत्रींचा मेकअप ट्युटोरियल इंटरनेटवर चर्चेत!

कियारा अडवाणी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट, नुकतीच एकत्र घेतली होती ज्योतिष्याची भेट!

माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.