Varun Dhawanनं असं काहीसं केलं नववर्षाचं स्वागत, चाहत्यांकडून कौतुक, पाहा Photo

अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) एक कुटुंबप्रिय व्यक्ती आहे. त्यानं त्याचे वडील डेव्हिड धवन(David Dhawan)सोबतच्या त्याच्या बॉन्डिंगचा उल्लेख अनेकवेळा केलाय. आता नवीन वर्षाची सुरुवातही अभिनेत्यानं पापा डेव्हिड धवन यांच्या आशीर्वादानं केलीय.

Varun Dhawanनं असं काहीसं केलं नववर्षाचं स्वागत, चाहत्यांकडून कौतुक, पाहा Photo
वरूण धवन
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 1:10 PM

मुंबई : अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) एक कुटुंबप्रिय व्यक्ती आहे. त्यानं त्याचे वडील डेव्हिड धवन(David Dhawan)सोबतच्या त्याच्या बॉन्डिंगचा उल्लेख अनेकवेळा केलाय. आता नवीन वर्षाची सुरुवातही अभिनेत्यानं पापा डेव्हिड धवन यांच्या आशीर्वादानं केलीय. वडिलांसोबतचे प्रसन्न फोटो शेअर करत त्यानं चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘माझ्यावतीनंही पायांना स्पर्श कर’ फोटोमध्ये वरूण वडिलांच्या पायाजवळ बसून स्मित हास्य करताना दिसतोय. डेव्हिड आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत आहे. वडील आणि मुलाचा हा हसतमुख फोटो चाहत्यांनाही खूप आवडलाय. टीव्हीवरचा लोकप्रिय निवेदक मनीष पॉल लिहितो, ‘कृपया माझ्यावतीनंही पायांना स्पर्श कर!!! मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. इतर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी वरूणच्या या फोटोचं कौतुक केलंय. काहींनी हार्ट इमोजीसह लिहिलं तर काहींनी लिहिलं ‘हा फोटो आशीर्वाद आहे.

‘…तेव्हा वडिलांना आनंद झाला’ वरूण धवननं मुलाखतीत सांगितलं होतं, की त्याच्या वडिलांनी त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करावं, असं वाटत नव्हतं. यामागचं कारणही त्यानं दिलं होतं. तो म्हणाला होता, की माझ्या वडिलांनी 40 चित्रपट केले आहेत, पण करण जोहर आणि यश चोप्रा नवीन चेहरे लाँच करतात. माझ्या वडिलांनी आजपर्यंत एकही नवीन चेहरा लाँच केलेला नाही. करण जोहरसोबत मी पदार्पण केलं याचा मला आनंद आहे. पापा आणि करण तसे तर खूप जास्त एकमेकांना ओळखतही नाहीत, कारण त्यांचे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आले आहेत. मी करणला जॉइन केलं, हे कळल्यावर पप्पा खुश झाले.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

पिता-पुत्राची जोडी झाली होती फ्लॉप वरूणनं अनेक वर्षांनी डेव्हिड धवन यांच्यासोबत काम केलं. वरूणला डेव्हिड धवन यांनी त्याच्या कुली नंबर या हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये कास्ट केलं होतं. दुर्दैवानं या पिता-पुत्राच्या चित्रपटाला फ्लॉपचा शिक्का बसला. प्रेक्षकांनी हा चित्रपट साफ नाकारला होता.

Bigg Boss 15 : बॉबी देओलनं साकारली होती धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका, वडिलांनी सांगितला किस्सा

Bigg Boss 15 : सलमान खानचा संयम सुटला, बिग बॉसच्या घरात शमितासोबत असं काय घडलं?

Vicky Kaushal अडचणीत; इंदौरच्या रहिवाशानं केली पोलिसांत तक्रार, वाचा काय प्रकरण आहे…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.