बिग बी आणि रश्मिकाच्या ‘Good Bye’मध्ये ‘या’ टीव्ही अभिनेत्याची एंट्री, गाजवणार मोठा पडदा!

लॉकडाऊन होण्यापूर्वी शिविन टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' मध्ये दिसला होता. शिविन यांनी दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर आता चाहते अतिशय खुश झाले आहेत. त्याच्या या चित्रपटाची चाहते अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत.

बिग बी आणि रश्मिकाच्या ‘Good Bye’मध्ये ‘या’ टीव्ही अभिनेत्याची एंट्री, गाजवणार मोठा पडदा!
शिविन नारंग
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 11:15 AM

मुंबई : ‘वीरा’ या मालिकेतून हिंदी मनोरंजन विश्वात पदार्पण करणारा अभिनेता शिविन नारंगने (Actor Shivin Narang) ‘इंटरनेटवाला लव’, ‘बेहद’ अशा बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. हा टीव्ही अभिनेता लवकरच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) ‘गुड बाय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विकास बहल हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना यासंदर्भात माहिती देताना शिविनने ‘गुड बाय’ म्हटले आहे आणि कॅप्शनमध्ये ‘डे 1’,असे लिहिले आहे (Veera Fame Actor Shivin Narang sharing screen with Amitabh Bachchan and Rashmika Mandanna).

लॉकडाऊन होण्यापूर्वी शिविन टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ मध्ये दिसला होता. शिविन यांनी दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर आता चाहते अतिशय खुश झाले आहेत. त्याच्या या चित्रपटाची चाहते अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्य सुरू झाले आहे. चित्रपटाचे बहुतेक शूटिंग हे चंदीगडमध्ये होणार आहे. रश्मिका आणि शिविनने शूटिंग सुरू केले असून, लवकरच अमिताभ बच्चनही त्यांच्यासोबत शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

शिविन आणि रश्मिकाच्या शूटिंगला सुरुवात!

अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रश्मिका मंदानाचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करणार असून, चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे. या दिग्दर्शक-निर्माता जोडीने यापूर्वी ‘लुटेरा’ आणि ‘उडता पंजाब’ सारखे सर्वोत्कृष्ट चित्रपट केले आहेत. ज्यानंतर आता प्रत्येकजण या चित्रपटाविषयी खूप उत्सुक आहे. इतकेच नाही तर, या चित्रपटाविषयी बोलताना एकता कपूर म्हणाली की, या चित्रपटात आपल्याला भावना आणि करमणुकीचे अनेक रंग पाहायला मिळतील. हा संपूर्ण चित्रपट कौटुंबिक चित्रपट असणार आहे.

(Veera Fame Actor Shivin Narang sharing screen with Amitabh Bachchan and Rashmika Mandanna)

अमिताभ बच्चन शूटिंगसाठी सज्ज!

नुकताच अमिताभ बच्चन यांनीही कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर आता ते चित्रपटाच्या सेटवर काम करण्यास सज्ज झाले आहेत. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण सतत वाढताना दिसत आहेत. दरम्यान, खबरदारी म्हणून बॉलिवूड स्टार्सनी स्वतः कोरोना लसी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. ‘गुडबाय’ या चित्रपटात रश्मिका आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत. अमिताभ यांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे चित्रपटाच्या शूटिंगला पुढे ढकलण्यात आले होते.

चित्रपटाच्या मुख्य भागाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये होणार आहे. तसेच, शहरातील चित्रीकरणासाठी काही भाग मुंबईतील एका स्टुडिओमध्ये बनवण्यात आले आहेत. पहिले वेळापत्रक सुमारे एक महिना सुरु असणार आहे. तर, त्यानंतर कलाकार चंदिगड आणि हरिद्वार येथे स्वतंत्र कार्यक्रमांसाठी जातील. याआधी पहिले शेड्युल 23 मार्चपासून सुरू होणार होते.

(Veera Fame Actor Shivin Narang sharing screen with Amitabh Bachchan and Rashmika Mandanna)

हेही वाचा :

Happy Birthday Prabhu Deva | दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमापायी मोडला 16 वर्षांचा संसार, चित्रपटाच्या सेटवर जुळले सुत, वाचा प्रभु देवाबद्दल…

Rakhi Sawant | पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी राखी सावंत तयार, ‘या’ व्यक्तीशी बांधणार लग्नगाठ!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.