Video | ‘रॉकस्टार आशाताई’, हृतिक रोशनच्या गाण्यावर आशा भोसलेंनी धरला ठेका! पाहा व्हिडीओ
सध्या आशा भोसले यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर बराच धुमाकूळ घालत आहे, जो पाहून लोक चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये गायिका आशा भोसले या हृतिक रोशनची डेब्यू फिल्म 'कहो ना प्यार है' मधील सुपरहिट गाणे 'एक पल का जीना'वर चक्क नाचताना दिसत आहेत.
मुंबई : भारतीय मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी आपल्या गायनाची जादू जगभर पसरवली आहे. त्यांच्यासारखा सुमधुर आवाज कुणालाही मिळू शकत नाही. परंतु, आशा भोसले केवळ गाण्यातच नव्हे तर नृत्यातही तज्ज्ञ आहेत. याचा पुरावा त्यांच्या नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला असून, यात त्या बॉलिवूड अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट नर्तक हृतिक रोशनच्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे (Veteran Singer Asha Bhosle dancing on hritik roshan song video goes viral on internet).
आशा भोसलेंनी केली हृतिक रोशनची सिग्नेचर स्टेप
खरं तर, सध्या आशा भोसले यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर बराच धुमाकूळ घालत आहे, जो पाहून लोक चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये गायिका आशा भोसले या हृतिक रोशन (Hritik Roshan) याची डेब्यू फिल्म ‘कहो ना प्यार है’ मधील सुपरहिट गाणे ‘एक पल का जीना’वर (Ek Pal Ka Jeena) चक्क नाचताना दिसत आहेत. याहून आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी चक्क पदर खोचून हृतिकच्या स्टाईलमध्ये त्याच्या सिग्नेचर स्टेप्सही केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
(Veteran Singer Asha Bhosle dancing on hritik roshan song video goes viral on internet)
आशा भोसले यांचा हा व्हिडीओ फिल्मफेअरच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मात्र, आशा ताई नेमक्या हृतिक रोशनच्या या गाण्यावर नृत्य करत आहेत की गाणे आणखी इतर कोणते आहे, हे माहित नाही. आशाताई यांचा हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये या नृत्यावर हृतिकचे गाणे चपखल बसते ना?, असे म्हणण्यात आले आहे.
वयाच्या 88व्या वर्षी आश्चर्यचकित करणारे नृत्य!
हा व्हिडीओ खूप जुना आहे. हा व्हिडीओ एका कॉन्सर्ट दरम्यानचा आहे, जिथे उपस्थित लोक आशाताईंचा हा अवतार पाहून दंग झाले होते. वयाच्या 88 व्या वर्षी आशा भोसले यांची ही शैली खरोखर आश्चर्यचकित करणारी आहे. आता जो कोणी हा व्हिडीओ पहात आहे, त्यांना देखील त्यांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवता येत नाही. आशाताईंचा हा धम्माल डान्स पाहून त्यांचे चाहते देखील आश्चर्य चकित झाले आहेत.
‘रॉकस्टार’ म्हणत सोशल मीडियावर कौतुक
आशा भोसले यांचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते त्याच्या या खास शैलीवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीयत. तर काही लोकांनी आशा भोसले यांचे कौतुक करण्यास सुरुवात देखील केली आहे. या व्हिडीओवर ‘रॉकस्टार’ अशी कमेंट करत, त्यांनी आशा भोसले यांचे कौतुक केले आहे.
(Veteran Singer Asha Bhosle dancing on hritik roshan song video goes viral on internet)
हेही वाचा :
Radhe Trailer Review | सलमान खानने तोडला ‘नो किसिंग’ नियम, दिशा पटानीसोबत झाला रोमँटिक!