Sagar Sarhadi Death | ‘कभी-कभी’ फेम लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांचे निधन, जॅकी श्रॉफने व्यक्त केला शोक!

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि संवाद लेखक, तसेच अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक सागर सरहदी (Sagar Sarhadi) यांचे आज निधन झाले आहे.

Sagar Sarhadi Death | ‘कभी-कभी’ फेम लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांचे निधन, जॅकी श्रॉफने व्यक्त केला शोक!
सागर सरहदी
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 12:41 PM

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि संवाद लेखक, तसेच अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक सागर सरहदी (Sagar Sarhadi) यांचे आज निधन झाले आहे. या दिग्गज लेखकाच्या मृत्यूच्या बातमीस एएनआयने दुजोरा दिला आहे. सागर सरहदी यांना चित्रपट जगातील एक अतिशय कलात्मक लेखक मानले जायचे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सागर यांनी खाणे-पिणे पूर्णपणे सोडले होते. प्राप्त माहिती नुसार,  मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला (Veteran writer-director Sagar Sarhadi passes away in Mumbai).

मृत्यू समयी सागर सरहद हे 88 वर्षांचे होते. सागर सरहदी यांनी आपल्या कारकीर्दीतील ‘कभी कभी’, ‘चांदनी’ आणि ‘सिलसिला’ सारख्या सुपरहिट चित्रपटांद्वारे चाहत्यांवर खोल छाप पाडली. एका दीर्घ आजारामुळे रविवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.

आज होणार अंत्यसंस्कार

बातमीनुसार, सागर यांचे अंत्य संस्कार आज (22 मार्च) दुपारी आयोजित केले जाऊ शकतात. सागर सरहदी यांचा जन्म 11 मे 1933 रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. मात्र, या लेखकाने आपले घर पाकिस्तानात सोडले आणि ते आधी दिल्लीतील किंग्सवे कॅम्प येथे आले. त्यानंतर, मग ते मुंबईतील एक छोट्या भागात वास्तव्यास आले. मोठ्या संघर्षानंतर सागर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान मिळालं (Veteran writer-director Sagar Sarhadi passes away in Mumbai).

‘कधी-कधी’ने मिळाली विशेष ओळख!

सागर सरहदी यांना यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने योग्य ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा आपल्या कारकिर्दीत कधीच मागे वळून पाहिले नाही. इतकेच नव्हे तर, त्यांनी प्रसिद्ध चित्रपट ‘बाजार’मधून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता पाटील, फर्रुख शेख आणि नसीरुद्दीन शाह प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. सागर सरहदी या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक होते. या तिन्ही भूमिका त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने निभावल्या होत्या. समीक्षक स्तरावरही या चित्रपटाला बरीच प्रसिद्धी मिळाली.

त्यांनी ‘नूरी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘रंग’, ‘झिंदगी’, ‘कर्मयोगी’, ‘कहो ना प्यार है’, ‘व्यापार’, ‘बाजार’ आणि ‘चौसर’ यासारख्या हिट चित्रपटांसाठी पटकथा देखील लिहिली होती. सागर सरहदी यांच्या मृत्यूमुळे चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.

जॅकी श्रॉफने व्यक्त केला शोक!

View this post on Instagram

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफने सागर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे . इंस्टाग्रामवर सागर सरहदीचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले- मला तुमची आठवण येईल.

(Veteran writer-director Sagar Sarhadi passes away in Mumbai)

हेही वाचा :

Rashmika Mandanna | रश्मिकाच्या नव्या लूकवर चाहते झाले फिदा, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!

Adipurush | ‘बाहुबली’ प्रभासच्या चित्रपटात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.