लांब केस-दाढी, हातात परशु अन् डोळ्यात आग; विकी कौशलचा ‘महावतार’ लूक पाहून नेटकऱ्यांना धक्का

विकी कौशलचा छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार तोच विकीच्या अजून एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटातील त्याचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. त्याचा लांब केस, दाढी आणि हातातील परशु असलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

लांब केस-दाढी, हातात परशु अन् डोळ्यात आग; विकी कौशलचा 'महावतार' लूक पाहून नेटकऱ्यांना धक्का
Vicky Kaushal's "Mahavatar" Look: First Look Poster Revealed
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 2:04 PM

अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. विकीचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आधीच उत्सूक असताना आता अजून एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातील विकी कौशलचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. विकी कौशलचा हा लूक पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे.

विकी कौशलच्या नवीन चित्रपटाची घोषणा

विकी कौशलच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘महावतार’. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. सात चिरंजीवींमधील एक परशुराम यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे. विकी कौशलचा सिनेमातील लूक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. ‘छावा’चे निर्माते दिनेश विजान यांच्याच मॅडॉक फिल्म्सने ‘महावतार’ची निर्मिती केली आहे.

शस्त्र, शास्त्रात पारंगत, अधर्मीयांचा नाश, निसर्ग संवर्धनाला हातभार, स्त्रीसबलीकरणाला प्रोत्साहन, वैदिक धर्माचा प्रसार आणि मातृ पितृ भक्ती अशी ख्याती असलेले भगवान परशुराम यांच्यावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. विकी त्यांची भूमिका साकारणार आहे.

विकीचा लूक पाहून चाहत्यांना धक्का 

रिव्हील केलेल्या लूक पोस्टरमध्ये लांब दाढी- केस, भगवे कपडे, हातात परशु, डोळ्यात आग असा महावताराचाच लूक विकीचा दिसत आहे. मॅडॉक फिल्म्स आणि विकी कौशलने सोशल मीडियावर फर्स्ट लूक शेअर केला आहे. ‘महावतार’ हे सिनेमाचं टायटलही घोषित करण्यात आलं आहे. धर्माचं रक्षण करणारा योद्धा चिरंजीवी परशुराम यांची कहाणी असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

‘महावतार’ मधील लूक मध्ये विकी कौशल अजिबातच ओळखू येत नाहीये. विकीचा हा लूक पाहताच नेटकऱ्यांना धक्काच बसला. ‘फक्त विकीच या भूमिकेला न्याय देऊ शकतो’ अशी कमेंट एकाने केली आहे. ‘महावतार’ पुढील वर्षी डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे. अमर कौशिकने सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे.

विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमाही पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. यामध्ये त्याने छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारली आहे. दिनेश विजाननेच सिनेमाची निर्मिती केली असून लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केले आहे. दरम्यान विकीचा हा लूक पाहून विकीच्या ‘महावतार’ या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आणि कुतूहल दिसत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.