Video | Hritik Roshan | हृतिक डिनरला ज्या मुलीसोबत गेला, ती नेमकी होती कोण? चाहत्यांना उत्सुकता!

हृतिक आणि त्यासोबत असलेल्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर अखेर ही मुलगी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. काहींना यावेळी हृतिकची चुलत बहीण पाशमिना रोशनही दिसली.

Video | Hritik Roshan | हृतिक डिनरला ज्या मुलीसोबत गेला, ती नेमकी होती कोण? चाहत्यांना उत्सुकता!
डिनरला नेमका कुणासोबत केला होता हृतीक? (Photo Source - Pinkvilla)
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 12:24 PM

मुंबई : हृतिक रोशन (Hritik Roshan) हा शुक्रवारी मुंबईत डिनरसाठी जाताना स्पॉट झाला होता. कोरोनातून बरा झाल्यानंतर हृतिक पहिल्यांदाच बाहेर डिनरसाठी आल्याचं माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपलं गेलंय. दरम्यान, यावेळी हृतिकसोबत एक मुलगीदेखील होती. ही मुलगी नेमकी कोण होती, यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये (Popular Japanese Restaurant in Mumbai) हृतिक रोशन शुक्रवारी डिनरसाठी गेला होता. यावेळी हृतिकनं आपल्यासोबत असलेल्या मुलीचा हात हातात धरला होता. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हृतिक आणि त्यासोबत असलेल्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर अखेर ही मुलगी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. काहींना यावेळी हृतिकची चुलत बहीण पाशमिना रोशनही दिसली. पाशमिना ही हृतिक रोशने काका राजेश रोशन याची मुलगी आहे. अनेकांनी हृतिकचा अनोळखी मुलीसोबतचा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलंय.

ती साबा आझाद होती?

दरम्यान, काहींनी हृतिकसोबत दिसलेली मुलगी ही साबा आझाद असल्याचाही दावा केला आहे. साबा आझाद ही एक तरुण संगीतकार आहे. नासिरुद्दीन शाह यांच्या मुलासोबत गेल्या काही दिवसांपूर्वी सबा आझाद यांनी काम केलं होतं. दरम्यान, खरंच ही मुलगी साबा आझाद होती का, याला कोणतीच पुष्टी मिळू शखलेली नाही. पण मुलीसोबत हृतिक दिसल्यानं आता तो एका नव्या मुलीला डेट करतोय की काय, असाही सवाल काही चाहत्यांनी विचारला आहे.

नुकताच कोरोनातून झाला बरा!

हृतिक रोशनला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. यातून तो बरादेखील झाला होता. हृतिकच्या एक्स वाईफ सुजैनला कोरोनाची लागण झाल्यानंतर हृतिकही कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता अनेक दिवसांनंतर हृतिकचा एक तरुणीसोबतचा डिनरला गेल्याचा व्हिडीओ समोर आला आल्याचं चर्चांना उधाण आलंय.

पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

संबंधित बातम्या :

संगीत सोहळ्यात मौनी, सुरजचा सुपर डान्स, या गाण्यावर थिरकलं जोडपं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | तृतीयपंथी आईच्या मुलाचा डान्स पाहून भारावले, मिथुनसह परिणिती, करणचेही डोळे पाणावले!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.