जेव्हा मुंबईवरील हल्ल्याच्या आरोपाखाली संजय दत्तला झाली होती अटक, वाचा संपूर्ण प्रकरण
सुपरहिट चित्रपट देणाऱ्या संजयला जेव्हा 1993मध्ये अटक करण्यात आली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. सुपरस्टार म्हणून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या संजय दत्तवर गंभीर आरोप लावण्यात आले होते.
मुंबई : सुपरस्टार पालकांचा मुलगा असणारा अभिनेता संजय दत्त (Sunjay Dutt) नेहमीच वादात राहिला आहे. संजय दत्त स्वत: नायकाकडून खलनायकाकडे वळला होता. सुपरहिट चित्रपट देणाऱ्या संजयला जेव्हा 1993मध्ये अटक करण्यात आली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. सुपरस्टार म्हणून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या संजय दत्तवर गंभीर आरोप लावण्यात आले होते. कदाचित स्वत: संजयलासुद्धा माहित नसेल की, पुढे त्याचे काय होणार आहे (When Sanjay Dutt arrested for Mumbai Bomb Attack know the detail case).
नर्गिस आणि सुनील दत्त यांचा लेक संजय दत्त याने आपल्या पहिल्या चित्रपटाद्वारे दमदार पदार्पण केले होते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर संजयने फारच कमी वेळात चाहत्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या संजयला टाडा प्रकरणात 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. जाणून घ्या या प्रकरणाबद्दल अधिक…
मुंबई बॉम्बस्फोटात संजयचे नाव
1993 सालची ही गोष्ट आहे, जेव्हा 12 मार्च रोजी मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. या स्फोटांमध्ये 257 लोक ठार आणि 713 लोक जखमी झाले. 19 एप्रिल 1993 रोजी मुंबई बॉम्बस्फोटांच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी संजय दत्तला अटक केली, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले होते.
संजयवरील आरोप
संजयवर त्याच्या घरी एके-56 रायफल ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या रायफलचे दुवे म्हणजे थेट मुंबई बॉम्बस्फोट. या आरोपाखाली अभिनेताला अटक करण्यात आली.होती. अबू सालेम व रियाझ सिद्दीकी यांच्याकडून अवैध शस्त्रसाठा घेतल्यामुळे संजय दत्त याला ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांचा नाश केल्याप्रकरणी तो दोषी आढळला. पोलिसांनी संजयची काही तास चौकशी केली त्यानंतर संजय दत्त 18 दिवस तुरूंगात होता. मात्र, सर्व प्रयत्नानंतर 5 मे रोजी त्याला जामीन मंजूर झाला. या दरम्यान कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आपण शस्त्रे बाळगल्याचे संजयने सांगितले (When Sanjay Dutt arrested for Mumbai Bomb Attack know the detail case).
12 वर्षे चालली सुनावणी
1993i मध्ये संजयवर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा प्रकरण सुरू झाले होते आणि 30 जून 1995 रोजी त्याचा खटला सुरू झाला होता. त्यात त्याला निर्दोष सोडण्यात आले होते, परंतु त्याला शस्त्र कायद्यांतर्गत 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
जाणून घ्या संजय दत्तच्या प्रकरणात काय घडले :
19 एप्रिल, 1993 : संजय दत्तला मुंबई पोलिसांनी अटक केली आणि त्याच्या घराच्या झडती दरम्यान एके-56 रायफल जप्त केली.
26 एप्रिल 1993: संजय दत्तने पोलिसांना संपूर्ण सत्य सांगितले.
3 मे 1993 : संजयला जामिनावर सोडण्यात आले.
4 मे 1994 : संजयचा जामीन रद्द झाला, त्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
16 ऑक्टोबर 1995 : 16 महिने तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर जामीन मंजूर
डिसेंबर 1995 : संजयला पुन्हा अटक करण्यात आली आणि 1997मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.
28 नोव्हेंबर 2006 : संजय दत्तला ‘शस्त्रास्त्र कायदा’ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले, परंतु ‘टाडा अॅक्ट’ संबंधित सर्व प्रकरणांत तो निर्दोष सुटला.
31 जुलै 2007: बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अभिनेत्याला सहा वर्षांची शिक्षा.
21 मार्च 2013 : सर्वोच्च न्यायालयाने ‘टाडा’ कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आणि संजय दत्तला शिक्षा ठोठावली पण शिक्षेची मुदत पाच वर्षांपर्यंत कमी केली. यानंतर 2014 आणि 2015 या वर्षांत काही दिवसांच्या सुट्टींवर तो तुरूंगातून बाहेरही आला होता. त्याला डिसेंबर 2014मध्ये दोन आठवडे आणि ऑगस्ट 2015मध्ये 30 दिवस सुट्टी देण्यात आली होती. चांगल्या वागणुकीमुळे त्याला 2016मध्ये मुक्त करण्यात आले होते.
(When Sanjay Dutt arrested for Mumbai Bomb Attack know the detail case)
हेही वाचा :
Kangana Ranaut | इस्त्रायल मुद्द्यावर ट्रोल करणाऱ्यांना कंगना रनौतने सुनावले खडे बोल, म्हणाली…
‘बागबान’ फेम अभिनेत्याला अॅम्ब्युलन्सने फरफटत नेलं, साहिल चढ्ढा रुग्णालयात
Net Worth | महागड्या गाड्यांची आवड, करोडोंच्या संपत्तीचा मालक, वाचा ‘डार्लिंग’ प्रभासबद्दल…#Prabhas | #PrabhasNetWorth | #Entertainmenthttps://t.co/1MIzxF1GSU
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2021