मुंबई : बॉलिवूडसोबतच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्येही मोठे नाव कमावत आहे. हॉलिवूडमध्ये 10 वर्षांपासून काम करत असलेल्या प्रियांकाने नुकताच तिथे काम करण्याचा अनुभव शेअर केला. याशिवाय प्रियांका इन्स्टाग्रामवरून जोनास आडनाव काढून टाकण्यावरही बोलली आहे.
खरं तर, टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, प्रियांकाला विचारण्यात आले होते की, तिने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून जोनास आडनाव का काढून टाकले?, कारण त्यामुळे तिच्या आणि निकच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता, अशी चर्चा रंगली होती. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला फक्त माझे युजरनेम माझ्या ट्विटर अकाऊंटशी जुळवायचे होते. लोकांसाठी ही एवढी मोठी समस्या बनली आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटते. हा सोशल मीडिया आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी चील करा…’
यानंतर प्रियांकाला विचारण्यात आले की, जर तुम्ही खूप दिवसांपासून अमेरिकेत भारतीय अभिनेत्री म्हणून काम करत आहात, तर तुम्हाला आतापर्यंत कोणते बदल जाणवले? या प्रश्नावर प्रियांकाने उत्तर दिले की, ‘दक्षिण आशियाई कलाकार म्हणून आम्हाला हॉलिवूडमध्ये फारशा संधी मिळत नाहीत. व्यावसायिक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यासाठी खूप काम करावे लागते. मी 10 वर्षांपासून हॉलीवूडमध्ये काम करत आहे आणि आता मी तेच करत आहे जे मला खूप दिवसांपासून करायचे होते.
प्रियांका पुढे म्हणाली, ‘जगाला सांगण्यासाठी तुम्हाला खूप काम करावे लागेल. दक्षिण आशियाई मनोरंजनाची क्षमता त्यांना दाखवावी लागेल. आम्ही जगाच्या लोकसंख्येपैकी एक पंचमांश आहोत, परंतु तुम्हाला इंग्रजी-भाषेच्या मनोरंजनामध्ये ते प्रतिनिधित्व दिसत नाही. मला आशा आहे की मी माझ्या खांद्यावर अधिक जबाबदारी घेऊ शकेन.
प्रियांका ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांकाला हॉलिवूड स्टार कीनू रीव्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. कियानूसोबत काम केल्यानंतरही प्रियांकाने तिचा अनुभव सांगितला.
प्रियांका अभिनेत्याबद्दल म्हणाली, ‘कियानू खूप चांगला माणूस आहे. प्रत्येकाचे काम त्याला चांगले समजते. तो ज्या लोकांसोबत काम करतो त्यांच्याबद्दल त्याला चांगली माहिती असते आणि हेच त्याला अधिक खास बनवते.’
या चित्रपटातील प्रियांकाच्या भूमिकेबद्दल सांगायचे तर, ती यात सतीची भूमिका साकारत आहे. प्रियांकाच्या पात्राच्या पोस्टरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट आज म्हणजेच 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?
Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!