Yo Yo Honey Singh | कथकसोबत वेस्टर्न डान्स, रॅपर योयो हनी सिंगचा कॉलेजमधील व्हिडीओ चर्चेत!

कॉलेजच्या काळात हनी सिंग खूपच गोंडस दिसायचा आणि याचा पुरावा त्याचा हा थ्रोबॅक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ एका इव्हेंटमधला दिसत आहे, ज्यात हनी सिंग काम करताना दिसत आहे.

Yo Yo Honey Singh | कथकसोबत वेस्टर्न डान्स, रॅपर योयो हनी सिंगचा कॉलेजमधील व्हिडीओ चर्चेत!
हनी सिंग
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 9:31 AM

मुंबई : सेलिब्रिटींच्या बालपणीच्या फोटो आणि व्हिडिओंची चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. बर्‍याच प्रसंगी सेलेब्स त्यांच्या सोशल मीडियावर हे सर्व शेअर करत असतात. बर्‍याच वेळा त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याशी संबंधित मनोरंजक आठवणी यातून दिसतात. आता रॅपर हनी सिंग (Yo Yo Honey Sing) याच्या कॉलेजच्या दिवसांची एक क्लिप प्रचंड चर्चेत आली आहे. यात हनी सिंग देखील होस्टिंग करण्याबरोबरच नाचताना देखील दिसला आहे (Yo Yo Honey Singh throwback college gathering video gone viral on social media).

सेलेब्रिटींचे असे थ्रोबॅक व्हिडीओ पाहून चाहते खूप आनंदी होतात. तुम्हाला देखील असाच व्हिडीओ पाहायचा असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी रॅपर हनी सिंगचा थ्रोबॅक व्हिडीओ घेऊन आलो आहोत. या व्हिडीओमध्ये हनी सिंग आपल्या डान्सची झलक दाखवताना दिसत आहे.

असा दिसायचा हनी सिंग

कॉलेजच्या काळात हनी सिंग खूपच गोंडस दिसायचा आणि याचा पुरावा त्याचा हा थ्रोबॅक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ एका इव्हेंटमधला दिसत आहे, ज्यात हनी सिंग काम करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये, तो माईकवर बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणती, ‘बार-बार सबके नाम अनाउंस करने में बहुत देर हो रही है. अगर कोई और आना चाहता है तो आ जाए. जिनके नाम अनाउंस हो चुके हैं वो निकल गए हैं, जिनका नाम स्किप हो गया था अगर वो वापस आ गए हैं और पार्टिसिपेट करना चाहते हैं तो आ जाएं, प्लीज! वर्ना हम इसी से रिजल्ट फाइनलाइज कर लेंगे.’ यानंतर हनी सिंग स्वतःचं उठून नाचताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

(Yo Yo Honey Singh throwback college gathering video gone viral on social media)

हनी सिंगचे खरे नाव माहितेय?

हनी सिंगचा जन्म होशियारपूरमधील शीख कुटुंबात झाला असून, त्याचे खरे नाव हिरदेश सिंह आहे. हनी सिंगने त्याच्या चाहत्यांना देसी आणि इंग्रजी दोन्ही गाण्यांवर ठेका धरण्यास भाग पाडले आहे. त्याच्या गाण्यांनी आणि रॅपने लोकांना अक्षरशः वेड लावले होते. तो जे काही गायचा ते हिट ठरायचे, पण 2014मध्ये हनी सिंग अचानक गायब झाला होता. मात्र, तो परत आला आहे आणि त्याने पुन्हा आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे.

रॅपर हनी सिंगने आपल्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. 2000मध्ये ‘शराबी’, ‘अंग्रेजी बीट’ आणि ‘लुंगी डान्स’सारख्या गाण्यांनी त्याला रोतोरात स्टार बनलेले. हनी सिंग हा पंजाबी पॉपचा चेहरा मानला जात होता. आजही त्याच्या फॅन फॉलोव्हिंगची कमतरता नाही. सन 2016-17मध्ये तो लाईम लाईटपासून दूर होता. रिपोर्ट्सनुसार, त्याला बायपोलर झाला होता आणि तो दारूच्या व्यसनाधीन झाला होता. तथापि, या सगळ्यातून बाहेर पडत तो पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आला. ‘मखना’, ‘फर्स्ट किस’ आणि ‘शोर मचेगा’ अशी त्याची नवी गाणी पुन्हा एकदा गाजत आहेत.

(Yo Yo Honey Singh throwback college gathering video gone viral on social media)

हेही वाचा :

‘इट्स माय बर्थडे’…मंदिरा बेदीनं शेअर केला स्पेशल व्हिडीओ, पाहा हॉट अवतार

‘आजी’ शर्मिला टागोरने अद्यापही नाही पाहिला ‘छोट्या नवाबा’चा चेहरा, करीना कपूरने सांगितले कारण…

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.