बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड गाणं; महेश बाबूच्या बायकोचा बाथरूममधील ‘तो’ सीन पाहाताच वाटते लाज, लोक बदलतात चॅनल
एका ब्लॉकबास्टर चित्रपटात नम्रता शिरोडकरने सैफ अली खानसोबत देखील भूमिका केली. या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि मनीषा कोइराला देखील होते.
चित्रपटांमधून ब्रेक घेतल्यानंतर अभिनेत्री नम्रता शिरोडकरने आपला पूर्ण फोकस आपल्या कुटुंबावर केंद्रीत केला आहे. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरला एक मुलगा देखील आहे. 90 चं दशक नम्रता शिरोडकरने आपल्या अभिनयानं चांगलंच गाजवलं.नम्रताने सलमान खान, अजय देवगन, संजय दत्त, अक्षय कुमार, सुनील शेट्टीसह अनेक बड्या अभिनेत्यांसोबत लीड रोड केला.
एका ब्लॉकबास्टर चित्रपटात नम्रता शिरोडकरने सैफ अली खानसोबत देखील भूमिका केली. या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि मनीषा कोइराला देखील होते.’कच्चे धागे’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात नम्रता शिरोडकर आणि सैफ अली खान यांच्यावर एक गाण चित्रित करण्यात आलं होतं, ते गाणं आज देखील चांगलंच चर्चेत आहे.1994 मध्ये कच्चे धागे हा चित्रपट रिलीज झाला, तो बॉक्स ऑफिसवर बॉकबास्टर ठरला, या चित्रपटातील सर्वच गाणे सुपरहिट होते.या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील एक गाणं सैफ अली खान आणि नम्रता शिरोडकर वर चित्रित करण्यात आलं होतं.’एक जवानी तेरी एक जवानी मेरी’असे या गाण्याचे बोल होते, हे गाणं त्यामध्ये असलेल्या सीन्समुळे चांगलंच चर्चेत आलं. या गाण्यामध्ये नम्रताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.
या गाण्यांच संपूर्ण चित्रीकरण हे बाथरूममध्ये करण्यात आलं. या गाण्यात सैफ अली खान आणि नम्रता शिरोडकरची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली,हे गाण एवढं बोल्ड आहे की त्या काळात लोकांना हे गाणं आपल्या फॅमिलीसोबत पाहाता देखील येत नव्हतं, हे गाणं सुरू झाल्यानंतर चॅनल बदललं जायचं.किंवा टीव्ही थोड्यावेळासाठी बंद करायचे.
पूर्वीच्या काळी व्हिसीआर आणि सीडी प्लेअरवरच जास्त चित्रपट पाहिले जायचे, जेव्हा हे गाण सुरू व्हायचं तेव्हा घरातील स्त्रीया उठून जायच्या, त्यानंतर हे गाणं फॉरवर्ड केलं जायचं, जो हे सर्व करायचा तो देखील लाजायचा. मात्र एकातांमध्ये अनेकजण हे गाण खूप एंजॉय करायचे. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर ब्लॉकबास्टर ठरला होता.