Boney Kapoor : बोनी कपूर यांना यापूर्वीही चित्रपटाची ऑफर, ‘या’ चित्रपटात मिळाली होती खास भूमिका
बोनी कपूर यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे, मात्र सन 2021 पासून त्यांच्या कारकीर्दीला नवीन वळण आलं आहे. (Boney Kapoor had offer for a film)
मुंबई : बोनी कपूर यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे, मात्र सन 2021 पासून त्यांच्या कारकीर्दीला नवीन वळण आलं आहे. आता ते लव्ह रंजनच्या आगामी चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात करणार आहे, यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघं मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात बोनी कपूर हे रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत.
नुकतच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर हे अभिनयाबद्दल बोलले. बोनी म्हणाले, ‘अभिनयाची कल्पना माझ्या मनात कधी आली नाही. मी फक्त निर्माता म्हणून काम करत होतो. मी सहाय्यक संचालक आहे. मी एक प्रोडक्शन कंट्रोलर, निर्माता आहे आणि आता मी एक अभिनेता म्हणून माझ्या करिअरची सुरुवात करतोय. ‘
आपल्या भूमिकेविषयी बोलताना बोनी म्हणाले, ‘हो, मी चित्रपटात रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. आपल्याला माहित आहे की रणबीर एक उत्तम अभिनेता आहे आणि मी आता नवीन आहे. मात्र अनिल कपूर यांनी मला अभिनयासाठी पुढे जायला प्रेरित केलंय त्यामुळे मी माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. ‘
अर्जुनला जास्त श्रेय बोनी म्हणाले की अर्जुननं त्यांना अभिनय करण्यास भाग पाडलं. ते म्हणाले, मी लव रंजनला नकार दिला होता. त्यानंतर तो अर्जुनकडे पोहोचला. अर्जुन आणि माझ्या तिन्ही मुली जाह्नवी, अंशुला आणि खुशी यांनी मला चित्रपटाला होकार द्यायला सांगितलं. अर्जूननं मला समजावलं की तुम्ही नॅचरल राहा, यामुळे चांगले बदल घडू शकतात.
यशराज चोप्रानं दिली होती चित्रपटाची ऑफर बोनी यांनी सांगितलं की ‘यशराज चोप्रा यांनी ‘लम्हे’ या चित्रपटासाठी ऑफर दिली होती. मात्र मला माहिती नव्हतं की यशराज सीरियस आहे, मात्र त्यांनी मला ती भूमिका साकारायला ऑफर केली होती जी नंतर दिपक मल्होत्रा यांनी साकारली. मला असं वाटलं की मी श्रीदेवीच्या जवळ राहावं अशी त्यांची इच्छा आहे. कारण मी स्वित्झर्लंडलाही गेलो होतो जेणेकरुन चांदनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी श्रीला पाहू शकेन.’
संबंधित बातम्या
Nepotism : घे भरारी! सुष्मिता सेनचा लाडक्या लेकीला मोलाचा सल्ला
Fact Check | सोशल मीडियावरील ‘तो’ फोटो खरंच विरुष्काच्या लेकीचा?