मुस्लिम घरात जन्माला येऊन सुद्धा ब्राम्हणांप्रमाणे होत्या सवयी; हिंदू गर्लफ्रेंडसाठी धर्मांतर करायलाही तयार होता हा अभिनेता पण….

एक असा अभिनेता जो बॉलिवूडची शान तर होताच पण हॉलिवूडमध्येही तेवढीच प्रसिद्धी मिळवली होती. मुळात म्हणजे या अभिनेता मुस्लिम घरात जन्माला येऊन सुद्धा त्याच्या ब्राम्हणांप्रमाणे सवयी होत्या एवढच नाही तर तो त्याच्या हिंदू गर्लफ्रेंडसाठी धर्मांतर करायलाही तयार होता.

मुस्लिम घरात जन्माला येऊन सुद्धा ब्राम्हणांप्रमाणे होत्या सवयी; हिंदू गर्लफ्रेंडसाठी धर्मांतर करायलाही तयार होता हा अभिनेता पण....
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 2:16 PM

बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी हिंदू असूनही दुसऱ्या रिलीजनच्या अभिनेत्यांशी किंवा व्यावसायिकांशी लग्न केलं आहे. पण बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता होता जो आपल्या प्रेमासाठी चक्क मुस्लिम असून आपल्या हिंदू गर्लफ्रेंडसाठी धर्मांतर करायला तयार होता.

फक्त गर्लफेंसाठीच नाही तर तो लहानपणापासूनच तसा असल्याचं अभिनेत्याच्या घरच्यांनी सांगितलं आहे. हा अभिनेता एका मुस्लिम कुटुंबात जन्माला येऊनसुद्धा त्याच्या सवयी या हिंदूप्रमाणे होत्या असं त्याचे घरचे म्हणतात.

इरफान खानचा 58 वा वाढदिवस

हा अभिनेता बॉलिवूडची शान तर होताच पण हॉलिवूडमध्येही तेवढीच प्रसिद्धी मिळवली होती. आणि आज या अभिनेत्याचा 58 वा वाढदिवस आहे. तो अभिनेता म्हणजे अभिनेता इरफान खान. इरफान खान आज आपल्यात नाहीत. 29 एप्रिल 2020 रोजी इरफान खानचे ट्यूमरमुळे निधन झाले.

इरफान यांचा शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ होता. या चित्रपटाला त्याच्या चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. याशिवाय त्यांनी शेक्सपियरच्या कादंबरीवर आधारित मकबूल, हासिल, हिंदी मीडियम, तलवार या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

मुस्लिम कुटुंबात असूनही कधीही मांसाहार केला नाही 

इरफान खान यांचा जन्म राजस्थानमधील टोंक येथं झाला. मुस्लिम कुटुंबातील असूनही त्यांनी कधीही मांसाहार केला नाही. इरफान खान शेवटपर्यंत शाकाहारी राहिले. यामुळेच त्यांच्या घरातीलच मंडळी त्यांना ‘ब्राह्मण’ म्हणत.

अभिनेत्याचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान होते. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला होता की, मुस्लिम कुटुंबातून असूनही त्याला मांसाहार करायला आवडत नाही.

इरफान प्राणी प्रेमी होता एका मुलाखतीत इरफानने सांगितले होते की इरफान लहानपणापासून शाकाहारी आहे. तो नॉनव्हेज खात नसल्यामुळे त्याच्या घरातील लोक त्याला थट्टेने ब्राह्मण म्हणत. त्यांचे वडील गंमतीने म्हणायचे की त्यांच्या घरी ब्राह्मण जन्माला आला आहे.

एवढच नाही तर इरफानचे वडील त्याला शिकार करायला घेऊन जायचे, परंतु इरफान यांना प्राणी मारणे आवडत नव्हते. त्याला रायफल कशी वापरायची हे माहित होते पण तरीही त्याने कधीही शिकार केली नाही. इरफानला प्राणी आवडायचे हे देखील एक कारण होतं त्याने कधीही मांसाहार खाल्ला नाही.

बनायचं होतं क्रिकेटर इरफानचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानमधील जयपूर येथे मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. इरफानला अभिनेता नाही तर क्रिकेटर व्हायचे होते. एका मुलाखतीत इरफान खानने याचा खुलासा केला होता, त्याने म्हटले होते, एक काळ होता जेव्हा तो क्रिकेट खेळायचो.

सीके नायडू स्पर्धेसाठी त्याची निवडही झाली होती. त्यात इरफानचे 29 मित्र निवडले गेले होते ज्यांना शिबिरात जायचे होते, पण पैशाअभावी तो मात्र जाऊ शकला नव्हता.

बॉलिवूडमध्ये स्वत:च्या बळावर खास ओळख

नंतर इरफान खानने नंतर अभिनयासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी त्याची आई वारली.

इरफान खानने फिल्मइंडस्ट्रीमध्ये स्वत:च्या बळावर बॉलिवूडमध्ये काम कमावलं, आपली एक खास छाप सोडली आहे. जिथे प्रत्येक कलाकार त्याच्याबद्दल कायमच आदर आणि प्रेमानेच बोलतो.

गर्लफ्रेंडसाठी धर्मांतर करायचं होतं.

इरफान सुतापाला पहिल्यांदा NSD म्हणजेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये भेटला होता. दोघेही बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अभिनेता सुतापाच्या घरी देखील जायचा, इरफान तिच्यासाठी धर्मांतर करायलाही तयार होता. पण तशी वेळ आली नाही आणि त्या दोघांनी लग्न केलं.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.