
ब्राझीलचा प्रसिद्ध गायक अपघातात मरण पावला आहे. 23 वर्षीय एमसी केविनचे दोनच आठवड्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नाच्या अवघ्या दोनच आठवड्यांनंतर, गायक आपल्या पत्नीची फसवणूक करत होता आणि एका मॉडेलशी संबंध ठेवत होता. परंतु एका अत्यंत शोकांतनात या गायकला आपला जीव गमवावा लागला.

एमसी केविन (MC Kevin) हा त्याचा मित्र व्हिक्टरसमवेत ब्राझीलच्या रिओ दे जनेरियो शहरातील हॉटेलमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होता. या हॉटेलमध्ये त्याची भेट 26 वर्षीय मॉडेल बियान्काशी झाली. त्यांनी मिळून येथे ड्रग्सचे सेवन केले. ज्यानंतर व्हिक्टरने बियान्काला लांगिक संबंध प्रस्थापित करण्याची ऑफर केली.

तथापि, केविनने हे स्पष्ट केले की, त्याने 33 वर्षीय डीयोलेनशी लग्न केले आहे आणि म्हणूनच मॉडेलने हे संबंध गुप्त ठेवले पाहिजेत. मॉडेलने प्रथम याला नकार दिला, परंतु थोड्या वेळाने तिने दोघांची ऑफर स्वीकारली. यासाठी बियान्काने व्हिक्टर आणि केव्हिन यांच्याकडून 390-390 डॉलर्स घेतले.

हा करार झाल्यानंतर क्रूझ नावाची व्यक्ती त्याच हॉटेलमध्ये असेलेल्या केविनजवळ आली. जेव्हा त्याला या ऑफरबद्दल कळले, तेव्हा त्यानेदेखील यात सामील होण्याविषयी विचारले. तथापि, जेव्हा व्हिक्टर आणि केविन यांनी त्याला पळवून लावले, तेव्हा त्याने केविनच्या सुरक्षा रक्षकास जाऊन सांगितले की, केविनची पत्नी त्याचा शोध घेत आहे.

वास्तविक, क्रिमिनल लॉयर आणि केविनची पत्नी डीयोलेन देखील याच हॉटेलमध्ये होती. केविनला याबद्दल माहित नव्हते, परंतु क्रूझला हे माहित होते. यानंतर, केविनच्या सुरक्षा रक्षकाने व्हिक्टरला तसा संदेशही दिला की, केविनची पत्नी त्याचा शोध घेत आहे. व्हिक्टरने देखील केविनला याबद्दल सांगितले, परंतु केविन याकडे दुर्लक्ष केल.

तथापि, काही काळानंतर व्हिक्टर वॉशरूममधून बाहेर जात असताना त्याने पाहिले की, केविनची पत्नी त्याच्या खोलीत आली आहे. त्याचवेळी केविन बाल्कनीतून लटकून स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, या गडबडी दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो पाचव्या मजल्यावरून खाली पडला.

त्यानंतर केविनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या ब्राझिलियन गायकाची लोकप्रियता इतकी होती की, सुपरस्टार फुटबॉलर नेयमारनेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केविनचे इंस्टाग्रामवर 10 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तो सोशल मीडियावर खूप अॅक्टिव होता.

बियान्का या प्रकरणात प्रचंड वादात सापडली असून, सोशल मीडियाद्वारे तिच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोक मला जज करत आहेत. परंतु, त्यांना हे समजले पाहिजे की, मी त्याच्याकडे गेले नाही, तर केविन माझ्याकडे आला होता. कोणत्याही सामान्य व्यक्तीप्रमाणेच, या घटनेनंतर मलाही धक्का बसला आहे.