“मी डेमिसेक्सुअल”; प्रसिद्ध अभिनेत्री तथा गायिकेने केला लैंगिकतेबाबत मोठा खुलासा
काही वर्षांपासून लोकही लैंगिकतेबाबतच्या त्यांच्या भावना , मत, विचारसगळंच अगदी उघडपणाने आणि मोकळेपणाने मांडू लागले आहेत. अशाच पद्धतीने एक अभिनेत्री तथा गायिकेने ती डेमिसेक्सुअल असल्याचे सांगत मोठा खुलासा केला आहे,
काही वर्षांपासून लोकही लैंगिकतेबाबतच्या त्यांच्या भावना , मत, विचारसगळंच अगदी उघडपणाने आणि मोकळेपणाने मांडू लागले आहेत. मग ते लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर असो अशा प्रत्येक विषयावर मोकळेपणाने बोललं जाऊ लागलं आहे. मुळात लोकं आपण कोण आहोत याचा स्विकार करत आपली ओळख न लपवता ती समाजासमोर उघडपणे मांडू लागले आहेत. सेक्शुअॅलिटीबाबत मोकळेपणाने बोलू लागले आहेत.
अभिनेत्रीचा ‘डेमिसेक्सुअल’ असल्याचा मोठा खुलासा
अशाच पद्धतीने आत यामध्ये अजून एका शब्दाचा समावेश झाला आहे तो म्हणजे ‘डेमिसेक्सुअल’. डेमिसेक्सुअल हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल किंवा काहींना तो अगदीच नवीन असेल. पण त्यातही काही असेच भावनांचं कंगोरे लपलेले आहेत. एका प्रसिद्ध अभिनेत्री तथा गायिकेने ती ‘डेमिसेक्सुअल’ आहे असं जाहीरपणे सांगितलं आहे.
प्रसिद्ध ब्रिटीश गायिका, गीतकार आणि अभिनेत्री तुलीसा कॉन्टोस्टॅवलोस हीने ती डेमिअसेक्सुअल असल्याचे जाहिर केले आहे. ती ही माहिती देताना म्हटलं आहे की, ती डेमिसेक्सुअल आहे आणि यामुळे ती अजूनपर्यंत अविवाहित आहे. अभिनेत्रीच्या विधानानंतर आणि तिच्या या लैंगिकतेबाबत मोठ्या खुलासानंतर तिची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पण त्याहून अधिक चर्चा याची होतेय की, डेमिसेक्सुअल किंवा डेमिसेक्सुअली म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे.
तर थोडक्यात पाहुयात की डेमिसेक्सुअल म्हणजे नेमकं काय?
डेमिसेक्सुअल म्हणजे काय?
रिपोर्टनुसार तथा डॉक्टरांनी सांगितल्य़ाप्रमाणे ‘डेमिसेक्सुअल म्हणजे अशी व्यक्ती, जी दुसऱ्या व्यक्तीकडे लैंगिक किंवा शारीरिकदृष्ट्या आकर्षित होण्यापूर्वी त्याच्याशी मजबूत भावनिक बंध निर्माण करणं योग्य असल्याचं मानते. काऊंसिलिंग साइकोलॉजिस्ट प्रिया परुळेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना यासंबंधित माहिती दिली आहे. डेमिसेक्सुअल असणारी लोक कधीही प्रेम भावना अनुभवल्या शिवाय एखाद्याकडे लैंगिकरित्या आकर्षित होत नाहीत. सोप्या भाषेत याचा अर्थ, डेमिसेक्सुअल म्हणजे अशी व्यक्ती जी भावनिक संबंधांशिवाय लैंगिक संबंधासाठी आकर्षित होत नाही.
मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की, बहुतेक रिलेशनशिपमध्ये शारीरिक किंवा लैंगिक आकर्षण हे प्राथमिक असते. म्हणजेच, एखाद्याला पाहिल्यानंतर लोक प्रथम त्याच्याकडे शारीरिकदृष्ट्या त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये भावनिक बंध जुळू लागतात, पण डेमिसेक्सुअल लोकांमध्ये असं होत नाही. त्यांचे भावनिक बंध आधी जुळणं गरजेचं असतं.
डेमिसेक्शुअल कसे असतात?
आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी डेमिसेक्शुअल लोकांना एक खोलवर भावनिक जवळीकतेची गरज असते. हे लोक प्रेमशिवाय कुणासोबतही शारिरिक संबंध ठेवत नाहीत. यांच्यासाठी शारीरिक संबंधापेक्षा भावनिक नातं महत्त्वाचं असतं.