सुशांतचा केअर टेकर सीबीआयच्या रडारवर, माफीचा साक्षीदार करण्यासाठी प्रयत्न?

सुशांतच्या केअर टेकरला माफीचा साक्षीदार बनवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे (CBI focusing on Sushant Singh Care Taker).

सुशांतचा केअर टेकर सीबीआयच्या रडारवर, माफीचा साक्षीदार करण्यासाठी प्रयत्न?
खरंतर, सुशांतच्या आत्महत्येवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुशांतने आत्महत्या केली होती की त्याची हत्या करण्यात आली यावर मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला. सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या करण्यात आली असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 12:32 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत जवळपास 7 जणांची चौकशी केलीय. मात्र, सुशांतचा केअर टेकर दीपेश सावंत सीबीआयसाठी फार महत्त्वाचा ठरणार असल्याचं दिसत आहे. दीपेश सीबीआय तपासाला योग्य दिशा देऊ शकतो आणि म्हणूनच त्याला माफीचा साक्षीदार बनवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे (CBI focusing on Sushant Singh Care Taker).

सुशांतच्या घरातील केअर टेकर दीपेश सीबीआयच्या तपासातला महत्वाचा व्यक्ती मानला जात आहे. आता तर दीपेश माफीचा साक्षीदार होणार असल्याची माहिती आहे. सध्या दीपेश सीबीआय थांबलेल्या DRDO गेस्ट हाऊसमध्येच आहे. त्याला बाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

सुशांतच्याच फ्लॅटमध्ये राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंतनं बुधवारी सीबीआयला कथितपणे महत्वाची माहिती दिल्याचं बोललं जात आहे. यानुसार 8 जूनला रिया आणि सुशांतचं जोरदार भांडण झाल्याचं पिठाणी आणि दीपेशनं सांगितलंय. त्यानंतर रियानं 8 हार्ड ड्राईव्ह नष्ट केल्या आणि ती घरातून निघून गेली, असाही दावा त्यांनी केलाय.

सीबीआयच्या आधी दीपेशची मुंबई पोलिसांनी तीन वेळा आणि ईडीनं दोनदा चौकशी केलीय. आता सीबीआय त्याची कसून चौकशी करत आहे. दीपेशची 21 ऑगस्टला 7 तास, 22 ऑगस्टला 10 तास, 23 ऑगस्टला 9 तास, 24 ऑगस्टला पुन्हा 9 तास, 25 ऑगस्टला 8 तास, आणि 26 ऑगस्टला पुन्हा 10 तास चौकशी झालीय.

गुरुवारीही (28 ऑगस्ट) दीपेशची कसून चौकशी झाली. सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी दीपेशही फ्लॅटवरचा होता. त्यामुळं दीपेशला माफीचा साक्षीदार बनवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. असं झालं तर तो बारीक बारीक गोष्टी सांगण्याबरोरच 14 जूनला त्यांनं काय पाहिलं या संपूर्ण घटनेचा खुलासा करेल.

सुशांतकडे केअर टेकर म्हणून काम केलेला दीपेश सावंतला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी क्षेत्रात काम करायचं होतं. सुशांतच्या फ्लॅटवर दीपेशला रिया चक्रवर्तीनंच कामावर ठेवल्याचा दावा केला जात आहे. मात्र, रियाने हा दावा फेटाळला असून तो रिया सुशांतच्या घरी येण्याच्या आधीपासून सुशांतकडे असल्याचं तिने म्हटलंय.

दीपेश सुशांतच्या घरीच राहत होता. सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी दीपेश फ्लॅटवरच होता. सुशांतच्या मृत्यूनंतर दीपेश बरेच दिवस गायब होता. त्याला ईडीनंही समन्स बजावलं होतं. त्यामुळे आता सीबीआयच्या चौकशीत दीपेश काय माहिती देतो आणि या प्रकरणाला कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

आधी ईडी, नंतर सीबीआय, आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एन्ट्री, तिन्ही तपास यंत्रणांच्या रडारवर रिया चक्रवर्ती

‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला

Sushant Singh | हो, शवगृहात गेल्यावर पार्थिवाला सॉरी बोलले, पहिल्या मुलाखतीत रियाची रोखठोक भूमिका

संबंधित व्हिडीओ :

CBI focusing on Sushant Singh Care Taker

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.