CBI Inquiry | सुशांतला कोणता आजार होता? सुशांतला कोणते ड्रग्स द्यायची? सीबीआयकडून रियावर प्रश्नांचा भडीमार

सीबीआय डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये रिया, शोविक चक्रवर्ती, नीरज आणि सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी करत आहेत.

CBI Inquiry | सुशांतला कोणता आजार होता? सुशांतला कोणते ड्रग्स द्यायची? सीबीआयकडून रियावर प्रश्नांचा भडीमार
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 4:28 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय कसून चौकशी करत आहे (CBI Investigate Rhea Chakraborty). सीबीआयच्या सूत्रांनुसार, रियाला तपासणी कुठे व्हावी यासाठी काही पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी रियाने स्वत: डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये येण्यास तयार झाली. आज सीबीआय डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये रिया, शोविक चक्रवर्ती, नीरज आणि सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी करत आहेत (CBI Investigate Rhea Chakraborty).

सध्या दुसऱ्या फेरीतील चौकशी सुरु आहे. यामध्ये रियाला सुशांतच्या औषधी, त्याचे डॉक्टर्स, प्रिस्क्रिप्शन, मेडिकल हिस्ट्री, सुशांतच्या कुटुंबाने जे आरोप केले आहेत त्याबाबत प्रश्न विचारले जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सीबीआयने चौकशीत रियाला विचारलेले प्रश्न

  •  सुशांतला कोणता आजार होता?
  •  उचरासाठी तू सुशांतला कोणत्या डॉक्टरकडे नेलं?
  •  सुशांतच्या आजाराबाबत त्याच्या घरच्यांना का नाही सांगितलं?
  •  सुशांतला कोणते ड्रग्स देत होती?
  •  सुशांतला दिलेले ड्रग कोण पुरवायचे?

सिद्धार्ध पिठाणीबाबत मुंबईच्या सीबीआय मुख्यालयात चौकशी केली जात आहे. सिद्धार्थ चौकशीला चांगलं कॉऑपरेट कररत आहे. त्याला जेव्हाही बोलावलं जातं तो तेव्हा तो चौकशीसाठी हजर होतो. पिठाणीसोबत दोन-तीन आणखी जण आहेत, ज्यांच्याबाबत सीबीआय तपास करत आहेत.

8 जूनबाबत सुशांतच्या घरचे नोकर, मॅनेजरने जी साक्ष दिली आहे, त्याबाबतही रियाला प्रश्न विचारले जातील. एसपी नूपुर प्रसाद आणि तीन इंस्पेक्टर रियाची चौकशी करत आहेत. तर एसपी अनिल यादव हे शोविक चक्रवतीची चौकशी करत आहेत. वेळ पडल्यास सीबीआय यांना आमोरासमोर बसवून चौकशी करु शकते.

हेही वाचा : सुशांत स्वतः ड्रग्ज घ्यायचा की त्याला दिलं जायचं? सीबीआयचा नोकरांकडे मोर्चा, वॉचमनचीही चौकशी

मात्र, सध्या सीबीआय ड्रगच्या अँगलने चौकशी करणार नाही. त्याचा तपास एनसीबी करत आहे. रियाच्या त्या चॅटबाबत ज्यात ती ड्रग्सबाबत बोलत आहे, त्याबाबत पुढे चौकशी होऊ शकते. सध्या 8 जून रियाने सुशांतचं घर सोडल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत प्रत्यक्षदर्शींच्या साक्ष आणि विदेश टूरबाबत प्रश्न विचारले जात आहेत (CBI Investigate Rhea Chakraborty).

रियाच्या वडिलांची पाच ते सहा तास चौकशी

सुशांत सिंह राजपूत यांचे वडील केके सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटूंबावर 15 केटींची अफरातफर केल्याचा आरोप केला होता. या संदर्भात इडीने रियाचे वडील इंदिरजीत चक्रवर्ती यांची गुरुवारी (28 ऑगस्ट) पाच ते सहा तास चौकशी केली.

वाकोला स्थित एक्सिस बॅंकेत त्यांचं खातं आहे. या बॅंकेचे लॉकर, खातं इडीने स्कॅन केलं. तीन वाजता इडीची टीम सांताक्रुझ इथल्या वाकोला परिसरात दाखल झाली आणि तब्बल पाच ते सहा तास त्यांनी चौकशी केली. स्टेटमेंट रेकॉर्ड करुन रियाच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनाही इडी समन्स बजावू शकते.

राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे मागणी

राम कदम यांनी सुशांत सिंह प्रकरणांमध्ये ड्रॅग माफिया खत्री आणि सुशांत सिंहचे फोटो यांचा संबंध असल्याचं सांगण्यात आलं होतं. यावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. जर राम कदमांकडे या प्रकरणाचे फोटो होते, तर तपास यंत्रणेला का दिले नाहीत, त्यावर अर्णब गोस्वामीकडे पुरावे आहेत, तर तपास यंत्रणेला दिले नाहीत. या संदर्भामध्ये प्रस्तावाला उभा करत राम कदम आणि अर्णव गोस्वामी यांच्यावर चौकशी समितीकडे पुरावे लपवल्याप्रकरणी सुमोटो दाखल करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी आता राज्य सरकारकडे अनिल गोटे यांनी केली आहे

मुंबई पोलीस या प्रकारणात लुडबुड करत आहे – किरीट सोमय्या

सुशांत सिंग राजपूत हत्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसानं बाबत नाराजी व्यक्त केली. मुंबई पोलीस या प्रकारणात लुडबुड करत आहे, असा आरोप करत त्यांनी योग्य त्या पद्धतीने काम करावे. सीबीआय याप्रकरणी काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या कामात गडबड करु नये. ज्या पद्धतीने इंद्रायणी मुखर्जी केस प्रकरणी राकेश मारिया हे डायरेक्ट डिक्टेट करत होते. त्याच पद्धतीने सुशांत सिंह प्रकारणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे सुशांत सिंह प्रकरणात संशयास्पदरित्या काम करत होते. तर त्यांनी या केसमध्ये आता परत  हस्तक्षेप करु नये, असे मागणी सोमय्या यांनी केली आहे. तसेच, याप्रकरणी मुंबई पोलिसांचे दोन ते तीन अधिकारी हे  सीबीआयच्या चौकशीमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे.

CBI Investigate Rhea Chakraborty

संबंधित बातम्या :

“संदीप सिंह मोदींच्या बायोपिकचे निर्माते, फडणवीसांसह मंचावर” सचिन सावंत यांचे भाजपकडे बोट

सुशांतचा केअर टेकर सीबीआयच्या रडारवर, माफीचा साक्षीदार करण्यासाठी प्रयत्न?

‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.