सुशांत स्वतः ड्रग्ज घ्यायचा की त्याला दिलं जायचं? सीबीआयचा नोकरांकडे मोर्चा, वॉचमनचीही चौकशी
सीबीआय अधिकाऱ्यांनी पुन्हा सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, त्याचप्रमाणे नोकर नीरज सिंग, केशव बचनेर यांची सुरु केली आहे
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता अंमली पदार्थाच्या अनुषंगाने सुरु झाला आहे. सुशांतला मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ देऊन जीवे मारण्यात आलं नाही ना, या दिशेने आता सीबीआयचा तपास सुरु झाला आहे. सीबीआयच्या मदतीसाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाची एक विशेष टीम बनवण्यात आली आहे. तर सुशांतच्या नोकरांकडे सीबीआय सखोल तपास करत आहे. (CBI investigating Drugs angle in Sushant Singh Rajput Death Case)
ईडीच्या तपासात जया साह हिच्या मोबाईलमध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांचे नंबर आढळल्याने ईडीच्या अधिकाऱ्यांनी अधिक खोलात जाऊन तपास केला असता, रिया ही अंमली पदार्थ विक्रेत्याच्या संपर्कात असल्याचं उघड झालं. त्यात रियाने जयाच्या माध्यमातून ड्रग्ज मिळवून ते सुशांतला दिले असल्याचं म्हटलं जात आहे.
रिया आणि जया यांच्या व्हॉट्सअॅपवर ड्रग्जची देवाणघेवाण आणि त्याचा कसा डोस द्यायचा, याची चर्चा झाली आहे. हे चॅट ईडीच्या हाती लागले आहे. त्यामुळे तपास पुढे जाण्यासाठी सीबीआयला मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा मिळाला आहे.
हेही वाचा : आधी ड्रग्ज अँगल, आता बक्कळ पुरावे, सुशांत प्रकरणी सीबीआय रियाला अटक करण्याची शक्यता
सीबीआय आज दिवसभर याच मुद्यांवर तपास करत आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी आज पुन्हा सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, त्याचप्रमाणे नोकर नीरज सिंग, केशव बचनेर यांची सुरु केली आहे. हे तिघे सुशांतच्या घरात राहत होते. सुशांतच्या आत्महत्येच्या वेळीही ते घरी होते. त्यामुळे या तिघांना सुशांतला ड्रग्ज देत होते की नाही हे माहीत असावं, असा सीबीआयला संशय आहे. यामुळे पुन्हा एकदा या तिघांकडे चौकशी सुरु आहे.
सुद्धार्थ पिठाणी हा सुशांत आणि रियाचा ही मित्र होता. यामुळे सिद्धार्थकडे याबाबत चौकशी केली जात आहे. सुशांत ड्रग्ज घेतो, हे तुला माहीत होतं का? त्याला कोण ड्रग्ज आणून देत होते, असे प्रश्न विचारले जात आहेत. तर नीरज सिंग हा कुक आहे. आत्महत्येच्या आदल्या रात्री सुशांतला नीरज यानेच ज्यूस बनवून दिला होता. त्यामुळे त्याच्याकडेही ड्रग्जबाबत विचारणा केली जात आहे.
कोणकोणते प्रश्न?
सुशांतला ड्रग्ज दिल जात होतं का? सुशांतला कोणी ड्रग्ज आणून देत होतं का? ते ड्रग्ज कोणत्या पद्धतीत होतं? (CBI investigating Drugs angle in Sushant Singh Rajput Death Case) हे ड्रग्ज कोण घेऊन येत होतं? सुशांत स्वतः ड्रग्ज घ्यायचा का त्याला इतर कोणत्या माध्यमातून ड्रग्ज दिलं जायचं?
केशव बचनेर हादेखील सुशांतचा कुक आहे. सुशांत स्वतः ड्रग्ज घेता होता, हे अजून कोणाच्या स्टेटमेंटमध्ये आलं नाही. मग त्याला अन्न किंवा औषधांच्या माध्यमातून ड्रग्ज दिलं जात होतं का, याचा सीबीआय जोरात तपास करत आहे.
जर त्याला अन्नाच्या माध्यमातून ड्रग्ज दिल जात असेल तर त्याचा उलगडा कुकच्या माध्यमातून होऊ शकतो, यामुळे सीबीआय कुकच्या माध्यमातून तपासावर लक्ष केंद्रित करत आहे.
केशव यालाही अनेक प्रश्न विचारले जात आहेत. सुशांतला अन्न-पाण्याच्या माध्यमातून तर ड्रग्ज दिलं गेलं नाही ना, या अनुषंगाने केशव याला प्रश्न विचारले जात आहेत. यानंतर आता सुशांत ज्या ब्लॅक माउंट इमारतीत रहायचा त्या इमारतीच्या वॉचमनलाही सीबीआयने चौकशीसाठी बोलावलं आहे.
Maharashtra: The two Mumbai Police personnel, who were summoned by the CBI team investigating the #SushantSinghRajput death case, arrive at the DRDO guest house in Mumbai. pic.twitter.com/xHijFWxc1B
— ANI (@ANI) August 26, 2020
संबंधित बातम्या :
(CBI investigating Drugs angle in Sushant Singh Rajput Death Case)