“अपने टाइप का लडका देखो”; धनश्री-चहलच्या घटस्फोटानंतर चहलच्या कथित गर्लफ्रेंडचा व्हिडीओ समोर
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतर आरजे महवशचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने नात्याबद्दल आणि योग्य जोडीदार निवडण्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. नेटकऱ्यांना वाटते की हा व्हिडिओ म्हणजे तिने धनश्रीला मारलेला टोमणा आहे.

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. त्यांचे लग्न 4 वर्षातच तुटले. गेल्या वर्षापासून दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या, ज्या खऱ्या ठरल्या. मुंबई उच्च न्यायालयानेही आज म्हणजेच 20 मार्च रोजी चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाला मान्यता दिली. घटस्फोटानंतर धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये मिळाल्याचं म्हटलं जात आहे. घटस्फोटानंतर चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महवशचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर चर्चा आहे की हा व्हिडीओ धनश्रीसाठी टोमणा आहे.
आरजे महवशचा व्हिडीओ समोर
घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. घटस्फोटाचे नेमके कारण मात्र अजूनही समोर आलेलं नाही. दरम्यान आरजे महवशने एक रील शेअर केली आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘तु रहा दुसऱ्याच्या शोधात, आम्ही आमची मजा सुरु ठेऊ’ या व्हिडिओमध्ये महवश घर-गृहस्थीच्या गोष्टींबद्दल सांगताना दिसत आहे. तसेच तिने कोणत्याही व्यक्तीसोबत नातं कसं जपावं याबदद्लही सांगितलं आहे.
‘तुम्ही दुसऱ्यांना शोधत राहा, आम्ही मजेत राहतो…’
व्हिडिओमध्ये ती म्हणतेय, “जर तुम्हाला जाड किंवा पातळ, उंच, लहान, इंग्रजी बोलणारे, हिंदी बोलणारे, जिम करणारा, श्रीमंत, गरीब, यशस्वी किंवा अयशस्वी अशा कोणत्याही व्यक्तीला डेट करायचं असेल तर ती तुमची निवड आहे. तुम्हाला हव्या असणाऱ्या व्यक्तीलाच तुम्ही डेट करा. पण तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या असणाऱ्या व्यक्तीशी नातेसंबंध जोडून त्याला किंवा तिला त्रास देऊ नका. तुमच्या जोडीदाराची इतर मुला-मुलींशी सतत तुलना करू नका. तो असं करतो, असं वागतो, त्याचा अहंकार बघा. मग असेल तर त्यांच्याचसोबत जा. आपल्या पार्टनरसोबत कॅफेमध्ये जाऊन तिथे असलेल्या दुसऱ्या मुला, मुलींकडे पाहणे चुकीचे आगे. अनेकांसाठी ही कदाचित छोटीशी गोष्ट असले पण असेच मूर्ख पार्टनर तुमचा आत्मविश्वास नष्ट करतात” असं म्हणत तिने आपल्या जोडीदाराशी कसं वागावं याबद्दल सांगितलं आहे.
View this post on Instagram
“आपल्या टाईपच्या व्यक्तीला डेट करा”
तसेच व्हिडिओमध्ये ती पुढे म्हणते, ‘यामुळे तुमचा प्रियकर नेहमीच स्वतःला विरोध करेल, स्वतःला वेगळे करण्याचा प्रयत्न करेल आणि सावध राहील. जरी तुम्ही एखाद्याला फसवले तरी तुमच्या प्रियकराच्या मनात नेहमीच हा विचार असतो की तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात. एखाद्याला असा प्रश्न पडू लागतो की जर एखाद्या नात्याकडे विशिष्ट पद्धतीने पाहिलं असतं तर फसवणूक झाली नसती. तुमच्या प्रकारच्या लोकांना डेट करा. इतरांच्या प्रकाराचे अनुसरण करू नका कारण प्रत्येकाची निवड ही वेगळी असते आणि त्या पद्धतीचा पार्टनर कधीना कधी मिळतोच” असं म्हणत तिने नात्यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
नेटिझन्सच्या कमेंट्स
महवशचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, नेटिझन्सच्या लक्षात आले की हा व्हिडीओ म्हणजे धनश्रीसाठी टोमणा होता. एका युजरने लिहिलं, ‘जर तुम्हाला चहल आवडत असेल तर चहलला डेट करा.’ दुसऱ्याने म्हटलं, ‘शेवटी ती चहलबद्दलच बोलत आहे.’ तर एका युजरने असं म्हटलं की, ‘तिने हे थेट धनश्रीलाच सुनावलं आहे ‘