CHYD : ‘हे कोडं तुमच्या ‘कोड’मुळे सुटू द्यात…’ पत्र ऐकून डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी तरळलं…!

क्षकांना कायम खळखळून हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात पोस्टमन काकांच्या पत्रांनी मात्र भावुक वातावरण पाहायला मिळतं. | Chala hawa yeu dya

CHYD : 'हे कोडं तुमच्या 'कोड'मुळे सुटू द्यात...' पत्र ऐकून डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी तरळलं...!
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 10:12 AM

मुंबई :  प्रेक्षकांना कायम खळखळून हसवणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात पोस्टमन काकांच्या पत्रांनी मात्र भावुक वातावरण पाहायला मिळतं. भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर दिग्गज मान्यवरांना आमंत्रित केलं गेलं होतं.  वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, ज्येष्ठ कायदेज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने आणि ग्लोबल शिक्षक पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी ‘हवा येऊ द्या’च्या मंचावर उपस्थित होते. यावेळी विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदना पत्राच्या माध्यमातून पोस्टमन काकांनी (सागर कारंडे) मांडल्यावर डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी तरळलं…  (Chala hawa yeu dya Disle Guruji Emotional over teacher issue)

काय होतं पत्रात…?

“माझे वडील एका विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून शिकवतात… आमच्या वर्गातील काही पोरं शाळेत जेवढ्या पैशाचे टॉकलेट खातात ना… तेवढे पैसे माझ्या प्राध्यापक असलेल्या बापाला पगारातूनही मिळत नाहीत… माझा बाबा 4 वर्ष एका शाळेवर जवळपास फुकट काम करतोय… गुरुजी तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कॉलेजमध्ये माझ्या वडिलांच्या हाताखाली शिकलेली पोरं कमवायला लागलीत… धाब्यावर खायला प्यायला येतात… त्यांना माझे वडील वेटर म्हणून सर्विस देतात. वर्गात नीट शिकत नाहीत म्हणून माझ्या वडिलांनी शिक्षा केलेली मुलं धाब्यावर एका बैठकीत हजार रुपये बिल करतात. कधी कधी वाटतं ती पोरं माझ्या वडिलांनाच एवढं शिकायची काय गरज होती म्हणून शिक्षा करत असतील…”

“आपल्या विद्यार्थ्यांनी बील देताना दिलेली टीप माझ्या वडिलांना खूप काही शिकवून जात असणार… तुम्हाला पुरस्कार मिळाल्यावर सगळे मंत्री, राज्यपाल तुमच्यासोबत कौतुकाने फोटो काढत होते..म्हणून तुम्हाला पत्र लिहिलं, कदाचित तुमचं ऐकतील. शिक्षकांचेच प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे प्रश्न कसे सुटतील.. गुरुजी तुम्ही शिक्षणासाठी क्यूआर कोड बनवलात ना… आता नोकरीपासून वंचित शिक्षकांसाठी एखादा क्यूआर कोड बनवा…. हे कोडं तुमच्या कोडमुळे सुटू द्यात…”

चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून नेहमीच सामाजिक प्रश्नांवर भाष्य केलं जातं. समाजाच्या प्रश्नांवर झटणाऱ्या हातांचं नेहमीच कौतुक केलं जातं. डिसले गुरुजींना ग्लोबल शिक्षक पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं. त्यांनी शिक्षणासाठी राबवलेल्या अनोख्या क्यूआर कोड प्रयोगाच्या माध्यमातून ते जगभर पोहोचले. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन ‘त्यांना हवा येऊ द्या’ च्या मंचावर आमंत्रित केलं गेलं. यावेळी विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा आणि वेदना लेखक अरविंद जगताप लिखित पत्रातून अभिनेता पोस्टमन काका सागर कारंडे याने डिसले गुरुजींसमोर मांडल्या. या पत्रातील व्यथा ऐकून डिसले गुरुजींना भावना अनावर झाल्या. यावेळी डिसले गुरुंजीच्या डोळ्यात पाणी तरळलं…

(Chala hawa yeu dya Disle Guruji Emotional over teacher issue)

हे ही वाचा

जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून ‘पोलखोल’

Special Story | मनोरंजन विश्वात ‘चला हवा येऊ द्या’ची हवा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.