ढोलकीचा आवाजाने घायाळ करणारा चंद्रमुखी चित्रपट लवकरचं तुमच्या भेटीला, अजय अतुलचं दमदार संगीत

टिझरमध्ये तुम्हाला ढोलकीचा आवाज घायाळ करतो, तसेच घुंगराचे बोल, साजशृंगार सोबत सौदर्याची नजाकत पाहायला मिळते.

ढोलकीचा आवाजाने घायाळ करणारा चंद्रमुखी चित्रपट लवकरचं तुमच्या भेटीला, अजय अतुलचं दमदार संगीत
चंद्रमुखी चित्रपटाचे बॅनर
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 9:18 AM

मुंबई – कोरोनाच्या (corona) काळात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुर्ण झाले नव्हते. तसेच अनेकांनी आपले प्रोजेक्ट पुढे ढकलले होते. तर अनेकांचे प्रोजेक्ट अपुरे राहिले होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्याने अनेकांनी आपली काम करायला सुरूवात केली. तसेच येत्या नव्या वर्षात अनेक नवीन चित्रपट थिअटरमध्ये पाहायला मिळणार आहेत. आत्तापर्यंत प्रसाद ओक (prasad oak) यांनी रसिकांना अनेक चांगले चित्रपट दिले, त्यापैकी ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या अधिक पसंतीला पडले. सध्या प्रसाद ओक यांचा बहुचर्चित चंद्रमुखी (chandramukhi) हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला असून येत्या 29 एप्रिलला चंद्रमुखी चित्रपट राज्यात अनेक ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटाची त्यांच्या चाहत्यांमध्ये तसेच सोशल मीडियावरती चर्चा होती. देशात कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे अनेक गोष्टींना विलंब झाल्याचे प्रसाद ओक म्हणाले आहेत.

टिझरसोबत दिलाय महत्त्वाचा मॅसेज 

टिझरमध्ये तुम्हाला ढोलकीचा आवाज घायाळ करतो, तसेच घुंगराचे बोल, साजशृंगार सोबत सौदर्याची नजाकत पाहायला मिळते. हा टिझर प्रसाद ओक यांनी सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती शेअर केला असून त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना तो चित्रपट आवडला असल्याचे सांगितले आहे. तसेच राजकारण आणि नृत्यांगणा याच्यात निर्माण होणारी ओढ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रसद ओक यांनी सोशल मीडियावर टिझर शेअर करताना “तो ध्येय धुरंधर राजकारणी…ती तमाशातली शुक्राची चांदणी…लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची… राजकीय रशिली प्रेमकहाणी…29 एप्रिल पासून तमाशाचा खेळ पडद्यावर सजणार, अजय-अतुलची गाणी पुन्हा एकदा वाजणार!” अशी पोस्ट लिहीली आहे. त्यामुळे मराठी चित्रपट पाहणा-या अनेक रसिकांना नेमकं चित्रपटात असेल याचा थोडक्यात अंदाज आला असेल असं वाटतं

अजय-अतुल ‘चंद्रमुखी’चं संगीत यापुर्वी प्रसाद ओक यांनी मराठी रसिकांना चांगले चित्रपट दिले आहेत, त्यामुळे हा चंद्रमुखी हा चित्रपट देखील चांगला असेल. त्यामधील राजकारणी आणि नृत्यागणा मधील ओढ पाहायला मिळणार आहे. 29 एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तो चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल असं वाटतंय. मागच्या चित्रपटांवरून असं वाटतंय की, प्रसाद किती संवेदनशील दिग्दर्शक आहे. मधल्या काळात थिअटर बंद असल्याने चित्रपट प्रदर्शित करण्यास विलंब झाला आहे. चंद्रमुखी ही विश्वास पाटलांची कांदबरी आहे. त्या कांदबरीवर आधारित चित्रपट आहे. तसेच अजय – अतुल या दमदार जोडीने ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे.

Sherlyn Chopra Birthday : शर्लिन चोप्राचा दब्बू लडकी ते playboy मॅगझिनपर्यंतचा प्रवास, वाचा खास स्टोरी…

अनिल अंबानी यांच्या लव्हस्टोरीत भूकंपाचा काय संबंध ? जाणून घ्या

Video: कपिल शर्मा फिरकी घ्यायला गेला अन् तोंडावर पडला, प्रेक्षकानं कोण आहे ते सांगितलं तेव्हा वरुण धवनही सावध बसला!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.