प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी ‘छावा’ने दिला सर्वांनाच झटका; शाहरुख-रणबीरही हादरले

| Updated on: Feb 23, 2025 | 1:38 PM

'छावा' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही कमाल कामगिरी केली आहे. दुसऱ्या शनिवारी हा सर्वाधिक कमाई करणार हिंदी चित्रपट ठरला आहे. विकी कौशलच्या या चित्रपटाने मोठमोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी छावाने दिला सर्वांनाच झटका; शाहरुख-रणबीरही हादरले
विकी कौशल
Image Credit source: Instagram
Follow us on

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी छप्परफाड कमाई केली आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून दुसऱ्या आठवड्यातही त्याची थिएटरवर चांगली पकड आहे. ‘छावा’ या चित्रपटाने शाहरुख खानचा ‘पठाण’, ‘जवान’, रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ आणि सनी देओलचा ‘गदर 2’ या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार ‘छावा’ने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी 44.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2025 या वर्षातील हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘छावाने बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली आहे. दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत 83.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसऱ्या शनिवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हा दुसरा चित्रपट ठरला आहे. इतकंच नव्हे तर पहिल्या शनिवारपेक्षा दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाची दमदार कमाई झाली आहे. हे एक दुर्मिळ आणि उल्लेखनीय यश आहे. याशिवाय ‘छावा’ हा रविवारी, प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी कमाईचा 300 कोटी रुपयांचा आकडा पार करणार आहे. ‘

हे सुद्धा वाचा

फक्त हिंदी चित्रपटांचा विचार केला तर, ‘छावा’ने दुसऱ्या शनिवारी सर्वाधिक कमाई केली आहे. मात्र ‘पॅन इंडिया’ चित्रपटांचा विचार केला तर या यादीत अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट पहिल्या स्थानी आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी 63 कोटी रुपये कमावले होते. ‘छावा’ने आतापर्यंत जगभरात 382 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे 400 कोटींचा टप्पा लवकरच पार होणार आहे.

या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई, अक्षय खन्नाने औरंगजेब, विनीत कुमार सिंहने कवी कलश यांच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर, मनोज कोल्हटकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या काही दिवसांत जगभरातील ‘छावा’च्या कमाईचा आकडा 500 कोटींचा टप्पा पार करण्याची दाट शक्यता आहे. या चित्रपटाचं बजेट 130 कोटी रुपये असल्याचं समजतंय.