‘चिमणी पाखरं’ चित्रपटातील ‘मंजू’ बालकलाकार आठवतेय का? पाहा आता किती बदलली आहे
2001 साली प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे 'चिमणी पाखरं' या चित्रपटाने सर्वांच्याच मनात घर केलं होतं.चित्रपटातील बालकलाकारांनी केलेले काम सर्वांच्याच मनाला भिडणारे होते. त्याच बालकलाकारांपैकी थोरल्या मुलीची भूमिका करणारी मंजू आठवतेय का? तब्बल 24 वर्षांनतर पाहा ही बालकलाकार कशी दिसतेय अन् सध्या ती काय करतेय.
माहेरीची साडी, लेक चालली सासरला या चित्रपटांचा काळ गाजल्यानंतर जर प्रेक्षांच्या डोळ्यात पाणी आणलं असेल तर 2001 साली प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे ‘चिमणी पाखरं’. या चित्रपटाने सर्वांच्याच मनात घर केलं होतं. या चित्रपटाने थिएटर हाऊसफूल केले होते. चित्रपटाची कथा तर मनाला भावनारी होतीच पण त्यासोबतच चित्रपटातील बालकलाकारांनी केलेले काम सर्वांच्याच मनाला भिडणारे होते. चित्रपटातील गाणी सुद्धा आजही तेवढीच लोकप्रिय आहेत.
पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्यासह बाळ धुरी, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, तुषार दळवी या सारख्या कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. या कलाकारांसोबत चार बालकलाकार चित्रपटात झळकले होते. भारती चाटे, अविनाश चाटे, मेघना चाटे आणि निहार शेंबेकर. या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेकक्षकांची मने जिंकली होती.
‘चिमणी पाखरं’ प्रदर्शित होऊन आता जवळजवळ 24 वर्षांचा काळ लोटला आहे. ‘चिमणी पाखरं’च दिग्दर्शन चित्रपट महेश कोठारे यांनी केल होत, तर प्रख्यात ‘चाटे कोचिंग क्लासेस’चे मालक मच्छिंद्र चाटे याचे निर्माते होते. पण पुढे या बालकराकरांपैकी कोणीही कोणत्या चित्रपटात फार दिसले नाही. बरं पुढे त्यांनी काय केलं, ते कुठे आहेत याबद्दलही कधी माहिती मिळाली नाही.
यातील एक बालकलाकाराचा चेहरा मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आला आहे. पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर या मुलांपैकी थोरल्या मुलीची भूमिका करणारी मंजू आठवतेय का? या मंजूचे खरे नाव आहे भारती चाटे. भारती चाटे ही मच्छिंद्र चाटे यांचीच कन्या आहे. ‘चिमणी पाखरं’ हा भारतीने अभिनय केलेला पहिला चित्रपट होता. यानंतर ती पुन्हा कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. पण ती कला क्षेत्रातच अॅक्टिव आहे.
भारतीने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने लंडनमध्ये इंटरनॅशनल बिजनेसमधून एमबीए केले आहे. मॅनेजिंग प्रॉडक्शन, चित्रपट दिग्दर्शन, स्टोरी टेलिंग या विषयात तब्बल 9 वर्षांचा तिचा दांडगा अनुभव आहे. सुरुवातीला तिने माय मराठी या स्टेज शोची धुरा सांभाळली होती. ‘कोठारे व्हिजन’ मध्ये तिने एक वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले आहे.
आता भारतीबद्दल बोलायचं झालं तर ती आता विवाहित असून एका दोन गोंडस बाळांची आई आहे. आशिष नाटेकर हे तिच्या नवऱ्याचे नाव असून सायशा मुलीचे नाव आहे. लग्नानंतर भारतीने ‘तू का पाटील’ आणि ‘मेनका उर्वशी’ या चित्रपटांची सहनिर्मिती केली आहे. तसेच भारती आणि आशिष यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर ‘सायेशा इंटिग्रेटेड कम्युनिकेशन’ नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरु केली आहे. या संस्थेअंतर्गत अनेक चित्रपटांची निर्माती केली जाते.