मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारे संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव (Chitragupta Shrivastav) यांनी आपल्या कारकीर्दीत अजारमर गीतांना चाली दिल्या. 16 जानेवारी 1916 रोजी बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील संवरेजी या छोट्याशा गावात चित्रगुप्त यांचा जन्म झाला. चित्रगुप्त हे पेशाने प्राध्यापक होते. पाटण्यातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात ते अर्थशास्त्र शिकवायचे. त्यांनी पत्रकारितेत एमएची पदवीही मिळवली. पण ते जे काही करत होते, त्यात त्यांना रस नव्हता. त्यांना दरम्यानच्या काळात संगीताची आवड लागली. मग त्यांना समजून आलं की आपला कल संगीताकडे आहे. अशा परिस्थितीत एके दिवशी त्यांनी ठरवलं की संगीताला आता आपण वाहून घ्यायचा. यानंतर चित्रगुप्त पंडित शिवप्रसाद त्रिपाठींकडे पोहोचले.
चित्रगुप्त यांनी नोकरी सोडलं, संगीतात मन रमलं!
तिथे चित्रगुप्त संगीताचे बारकावे शिकू लागले. दरम्यानच्या काळात नोकरी सोडल्यानंतर चित्रगुप्त नशीब आजमावण्यासाठी मायानगरी मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांना एस.एन. त्रिपाठी यांची साथ मिळाली. त्यानंतर हळूहळू ते कामाला लागले. मग त्यांना एक दिवस ब्रेक मिळाला. 1946 मध्ये त्यांनी ‘फाइटिंग मास्टर’ चित्रपटाला संगीत दिले.
भोजपुरी सिनेमातून विशेष ओळख
सुरुवातीच्या काळात त्यांना छोटी छोटी कामं मिळाली. चित्रगुप्त यांनी त्या काळात छोट्या बजेटच्या बी ग्रेड चित्रपटांनाही संगीत दिले. ‘तुफान क्वीन’, ‘सिंदबाद द सेलर’, ‘अपलम चपलम’, ‘लेवेन ओ क्लॉक’, ‘साक्षी गोपाल’, ‘कल हमारा है’, ‘भक्त पुंडलिक’, ‘रामू दादा’ हे त्यांनी संगीत दिलेले काही चित्रपट होते. त्यानंतर हळूहळू भोजपुरी सिनेमाच्या संगीतासाठी त्यांना विशेष ओळख मिळाली.
कमी पैशात संगीत द्यायचे
चित्रगुप्त अशा युगात अतिशय साधे जीवन जगले, जिथे इतर संगीतकार त्यांच्या कामासाठी मोठा पैसा कमावत असत. चित्रगुप्त संगीत द्यायला फक्त 20 हजार रुपये घेत. हिंदी आणि भोजपुरी व्यतिरिक्त पंजाबी आणि गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी आपली प्रतिभा दाखवली. लता मंगेशकर यांच्यासोबत संगीतकार चित्रगुप्त यांचा एक किस्सा आहे.
‘चपलेवर भरोसा आहे, माझ्या आवाजावर नाही?’,थरारक किस्सा
लल्लन टॉपच्या रिपोर्टनुसार, एकदा दोघांनाही रेकॉर्डिंगसाठी सोबत स्टुडिओत जावं लागलं. चित्रगुप्त त्यादिवशी लंगडत चालले होते. मागून लता मंगेशकर येत होत्या. त्यांनी चित्रगुप्ताला अशा लंगडत चाललेल्या अवस्थेत पाहिलं. तेव्हा लतादीदींनी त्यांना विचारलं, ‘काय झालं? तुम्ही ठीक आहात का, पायाला काही लागलंय का, दुखतंय का?’ त्यावर चित्रगुप्त म्हणाले, ‘खरं तर मी तुटलेली चप्पल घालून आलो आहे.’ तर लता दीदी म्हणाल्या, ‘चला तुमच्यासाठी नवीन चप्पल घेऊ.’ तर चित्रगुप्त म्हणाले, ‘नाही नाही, ही चप्पल माझ्यासाठी भाग्यवान आहे, जेव्हा मी ती घालतो आणि माझ्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला जातो, तेव्हा सर्व ठीक होते…’
चित्रगुप्त यांचं बोलणं ऐकून लतादीदी हसल्या आणि म्हणाल्या, ‘अहो चित्रगुप्तजी, तुम्हाला तुमच्या चप्पलवर जास्त विश्वास आहे, माझ्या आवाजावर नाही.’, लतादीदींचा हे वाक्य ऐकून दोघेही हास्याच्या सागरात डुंबून गेले.
संबंधित बातम्या