कलाविश्वातून एक मोठी बातमी, दहा दिवस सिनेमा हॉल राहणार बंद

कलाविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उद्यापासून पुढील दहा दिवस सिनेमा हॉल बंद राहणार आहेत. नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.

कलाविश्वातून एक मोठी बातमी, दहा दिवस सिनेमा हॉल राहणार बंद
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 10:49 PM

कलाविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उद्यापासून पुढील दहा दिवस सिनेमा हॉल बंद राहणार आहेत. दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. (Telangana Cinema Halls Close 10 Days) इतकंच नाहीतर अनेक रेकॉर्डब्रेक गल्ला या चित्रपटांनी जमवला. अभिनेता महेश बाबू याचा ‘गुंटर करम’ आणि अभिनेता धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटांपेक्षाही प्रशांत वर्मा यांचा ‘हनुमान’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता आणखी बड्या बड्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होणार असताना सिनेमा हॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यत आला आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे जाणून घ्या.

नेमकं काय कारण?

संक्रातीला दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. यामधील ‘हनुमान’ आणि ‘टिल्लू स्क्वेअर’ हे दोन चित्रपट सोडले तर इतर कोणत्याही चित्रपटाला फार काही कमाल दाखवता आली नाही. आताचे गेले दोन ते तीन महिने तमिळ फिल्म इंडस्ट्रीसाठी फार काही चांगले गेले नाहीत. त्यामध्ये आता लोकसभा निवडणुक आणि आयपीएल चालू असल्याने त्याचा बसत असलेला फटकाही जाणवू लागला आहे. कारण अनेक चांगले चित्रपट असतानाही प्रेक्षकांचा हवा तसा काही प्रतिसाद मिळाला नाही.

सिनेमाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. त्यामुळे तेलंगणामधील सिंगल स्क्रिन थिएटर्स मालकांनी दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणात 17 मे पासून 10 दिवस सिनेमा हॉल बंद राहणार आहेत.  प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रुल’सह अनेक नवीन बिग बजेट चित्रपटांच्या रिलीजचा समावेश आहे. प्रत्यक्षात चित्रपटांच्या कमतरतेमुळे चित्रपटगृहे चालवण्यात चित्रपटगृह मालकांना अडचणी येत आहेत.

दक्षिण फिल्म इंडस्ट्रीचे आगामी चित्रपट

‘लव्ह मी’, ‘गँग्स ऑफ गोदावरी’, सुधीर बाबूचा ‘हरोम हरा’ आणि सत्यभामा हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’पासून ते प्रभासच्या ‘कल्की 2898AD’ पर्यंत आणि रामचरण आणि ज्युनियर एनटीआरचे चित्रपटही येणार आहेत.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.