सेटवर करायची सफाईचं काम; अनेकदा रिजेक्ट झाली, अभिनेत्रीने दिले एकाच वर्षात 8 हिट चित्रपट, शाहरुखची फिल्म नाकारली
बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत,ज्यांना आधी नाकारण्यात आलं मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर बी टाऊनमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं.
बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत,ज्यांना आधी नाकारण्यात आलं मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर बी टाऊनमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं. ज्यांनी या सेलिब्रिटींना नाकारलं त्यांना त्यांनी आपल्या कामातून उत्तर दिलं. अशीच एक अभिनेत्री सध्या बॉलीवूडमध्ये आहे तीने एकाच वर्षामध्ये तब्बल आठ हिट चित्रपट दिले. तीने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये त्या काळी ज्यांची सर्वात जास्त चलती होती, अशा माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांना देखील मागे टाकलं. तीने सलामान खान, अक्षय कुमार अशा अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे रवीना टंडन
रवीना टंडन हीने पत्थर के फूल या चित्रपटातून पर्दापण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हीट ठरला.मात्र त्यापूर्वी बॉलीवूडमध्ये पर्दापण करण्यासाठी तीला खूप मेहनत करावी लागली, तीने आपल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं की, बॉलीवूडमध्ये पर्दापण करण्यापूर्वी ती चित्रपटाच्या सेटवर साफ सफाईचं काम करायची.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवीना टंडनने सांगितलं की, मी चित्रपटात काम करण्यापूर्वी साफ-सफाईचं काम करत होते. स्टूडियो आणि चित्रपटाच्या सेटवर मला सफाईचं काम करावं लागायचं, मी जेव्हा दहावीमध्ये होते तेव्हापासून हे काम सुरू केलं. मी कधीही हा विचार केला नव्हता की मी एवढी मोठी अभिनेत्री होऊ शकते. मात्र यशाला मेहनतीशिवाय पर्याय नाही हेच खरं आहे.
एकाच वर्षात आठ सुपरहीट चित्रपट
रवीनाने पुढे बोलताना म्हटलं की, तीने अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन दिली मात्र तीला रिजेक्ट करण्यात आलं. मात्र त्यानंतर तीचं पत्थर के फूल या चित्रपटातून पर्दापण झालं. 1994 साली तीला लॉटरी लागली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण तीने या एकाच वर्षांत एकापाठोपाठ तब्बल आठ हिट चित्रपट दिले. ज्यामध्ये चार चित्रपट असे होते की त्यांनी त्या काळी कमाईचे सर्व विक्रम मोडले होते. त्यानंतर तीला शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या डर या चित्रपटात देखील मुख्य अभिनेत्रीच्या रोलसाठी ऑफर आली होती. मात्र तिने तो चित्रपट रिजेक्ट केला.मात्र त्यानंतर डर हा चिपत्रट ब्लॉकबास्टर ठरला. 2006 साली रवीना टंडने बॉलीवूडमधून ब्रेक घेतला होता, मात्र त्यानंतर आता तीने पुन्हा एकदा ओटीटीमधून पर्दापण केलं आहे.