राज ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांकडून राज्यात चित्रीकरणाला तत्त्वत: मान्यता

मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिल्यास त्यांना मंजुरी देता येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

राज ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांकडून राज्यात चित्रीकरणाला तत्त्वत: मान्यता
राज ठाकरे यांची ZOOM मिटिंग
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 5:27 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे राज्यात कुठल्याही प्रकारच्या चित्रिकरणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याबाबत 20 मे रोजी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं. या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, पण सध्या राज्यात चित्रीकरण पुन्हा सुरु होणं हे महत्त्वाचं आहे. टीव्ही मालिकांचं चित्रीकरण इतर राज्यात सुरु आहे, असं मत राज यांनी मांडलं. त्यानंतर मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिल्यास त्यांना मंजुरी देता येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. (CM Uddhav Thackeray approves shooting in Maharashtra)

उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती राज ठाकरे यांनी दिलीय. बायो बबल नेमका कसा असेल, कलाकार-तंत्रज्ञ यांची संख्या किती असेल, सरकारने आखून दिलेल्या नियमांची कशी अंमलबजावणी होणार, चित्रीकरणाची जागा कोणती असेल, कलाकार-तंत्रज्ञ यांची राहण्याची व्यवस्था काय असेल अशा सर्व बाबी नमूद असलेला प्रस्ताव जर प्रत्येक निर्मात्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे सादर केला तर त्यापुढील मंजुरीसाठी कार्यवाही करण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी सांगितलंय. आज झालेल्या ‘झूम’ संवादात निर्माते आणि टीव्ही चॅनल प्रमुख यांच्याशी राज ठाकरे यांनी आज चर्चा केली. गेले अनेक दिवस प्रलंबित असलेल्या या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी त्वरित तोडगा काढल्याबद्दल ‘झूम’ चर्चेत उपस्थित सर्वांनीच त्यांचे आणि मनसे प्रयत्नांचे मनापासून आभार मानले.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक परिसरातच चित्रीकरणासाठी परवानगीची शक्यता

सध्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकच्या आसपासच्या परिसरातच चित्रीकरणासाठी परवानगी मिळू शकेल, राज्यातील इतर भागात कोरोना संक्रमणाचं प्रमाण गंभीर आहे, त्यामुळे तिथे लगेचच चित्रीकरणासाठी परवानगी मिळणं कठीण आहे, असंही राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. मनोरंजन क्षेत्राला सध्या भेडसावणाऱ्या इतर गंभीर समस्यांबद्दलही सरकारी यंत्रणेसोबत पाठपुरावा सुरु राहील, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी दिलं आहे.

एक दिवसापूर्वीच कलाविश्वातील दिग्गजांचं गाऱ्हाणं

मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा राज ठाकरे यांनी 20 मे रोजी घेतला होता. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला. त्यांच्या समस्याही राज ठाकरेंनी जाणून घेतल्या. महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.

संबंधित बातम्या :

मांजरेकर, दामले, कोठारेंसह 50 दिग्गज कलाकारांशी चर्चा, राज ठाकरे म्हणाले, तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो

महेश भट, सुबोध भावे ते अमोल कोल्हे, मुख्यमंत्र्यांशी संवादात टीव्ही-चित्रपट निर्मात्यांचा महत्त्वाचा निर्णय

CM Uddhav Thackeray approves shooting in Maharashtra

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.