Video: पुन्हा एकनाथ शिंदेना डिवचलं? कुणाल कामराच्या नव्या व्हिडीओमध्ये आहे तरी काय?
Video: कॉमेडियन कुणाल कामराने नुकताच 'हम होंगे कंगाल...' हे नवे गाणे शेअर केले आहे. या गाण्यामध्ये त्याने नेमकं काय दाखवलं आहे? चला पाहूया...

कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यानंतर त्याने पुन्हा एकद नवे गाणे शेअर केले आहे. त्याचे ‘हम होंगे कंगाल…’ हे नवे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. आधीच्या गाण्यावरून वाद सुरु असतानाच कुणालने मुद्दाम, एकनाथ शिंदे यांना डिवचण्यासाठी हे दुसरे गाणे प्रदर्शित केल्याचे बोलले जात आहे. आता त्याचे हे गाणे नेमकं आहे तरी काय? चला पाहूया…
काय आहे कुणालच्या गाण्याचे बोल?




कुणाल कामराने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्याचे, ‘हम होंगे कंगाल, एक दिन मन मै अंधविश्वास, देश का सत्यानाश हम होंगे कंगाल, एक दिन होगे नंगे चारो और, करेंगे दंगे चारो ओर पोलिस के पंगे चारो ओर, एक दिन मन मै नत्थुराम, हरकते आसाराम हम होंगे कंगाल, एक दिन होगा गाय का प्रचार, लेके हाथो मे हत्थियार होगा संघ का शिष्टाचार, एक दिन जनता बेरोजगार, गरीबी की कागार हम होंगे कंगाल, एक दिन’ असे बोल आहेत.
Video: ‘गद्दारी करुन… ५० खोके एकदम ओक्के’; अजितदादांची मिमिक्री? म्हणत किरण मानने शेअर केला व्हिडीओ
View this post on Instagram
काय दाखवले आहे गाण्यात?
कुणाल कामराने भारताचे आणखी एक राष्ट्रगीत असे म्हणत व्हिडीओची सुरुवात केली आहे. त्यानंतर कुणालच्या ऑफिसची शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड दाखवण्यात आली आहे. त्यावेळी बॅकग्राऊंडला ‘हम होंगे कंगाल, एक दिन… मन में अंधविश्वास, करेंगे देश का सत्यानाश’ असे गाण्याचे बोल ऐकू येत आहेत. त्यानंतर त्याने राहुल कनालला झालेली अटक दाखवली आहे. त्यानंतर कुणालचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याचे दाखवले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
अनेकांनी केल्या कमेंट
कुणाल कामराचा हा नवा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘आता हे पाहून शिवसेना स्वत:च्या ऑफिसची तोडफोड करेल’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘मला स्वत:पेक्षा जास्त त्याची भीती वाटू लागली आहे’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘रोस्ट मोड अजूनही सुरु आहे’ अशी कमेंट केली आहे.