मुंबई : कॉमेडियन कृष्णा अभिषेक हा कायमच चर्चेत असतो. कृष्णा अभिषेक हा नुकताच बिग बाॅस 17 च्या मंचावर धमाल करताना दिसला. मात्र, कृष्णा अभिषेक हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. कृष्णा अभिषेक याचा मामा बाॅलिवूड अभिनेता गोविंदा हा आहे. मात्र, गेल्या काही दिवासांपासून गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असल्याचे दिसतंय. इतकेच नाही तर गोविंदा आणि त्याच्या पत्नीकडून काही आरोप देखील करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामधील संवाद देखील बंद झालाय.
कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामधील वाद जरी वाढला असला तरीही कृष्णा अभिषेक हा मामा गोविंदा याची नेहमीच आठवण काढतो. आता तर थेट मामा गोविंदा याच्याबद्दल मोठे भाष्य करताना कृष्णा अभिषेक हा दिसलाय. बाॅबी हा सलमान खान याला मामू म्हणताना दिसला. यावेळी लगेचच कृष्णा अभिषेक याला आपल्या मामाची आठवण येते.
किती चांगली बाब आहे की, बाॅबी सलमान खानला मामू म्हणतो…दुसरीकडे माझे मामा आहेत जे मला बोलवतच नाहीत. मस्तीमध्ये शायरी करत कृष्णा अभिषेक हा म्हणाला की, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहां दम था. हमारी कश्ती वहां डूबी जहां अपनों का प्यार ही कम था…पुढे कृष्णा अभिषेक म्हणाला आपले लोक ते आपले लोकच असतात धर्मेंद्र जी…
परंतू माझे लोक कुठे आहेत धर्मेंद्र जी…? यानंतर बिग बाॅसच्या मंचावरून कृष्णा अभिषेक हा मामा गोविंदा याला लव्ह यू बोलताना देखील दिसला आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामध्ये मतभेद दिसत आहेत. फक्त कृष्णा अभिषेक हाच नाही तर गोविंदा देखील एका मुलाखतीमध्ये जाहिरपणे कृष्णा अभिषेक याच्यासोबत असलेल्या रिलेशनवर बोलताना दिसला.
कृष्णा अभिषेक याने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी शूटिंगच्या सेटवर मामा गोविंदासोबत नेहमीच जात असत. त्यावेळी माझे मामा अभिनय आणि डान्स करायचे. ते पाहून मला खूप जास्त भारी वाटायते. नेहमीच कृष्णा अभिषेक हा मामा गोविंदा याच्याबद्दल आठवण काढताना दिसतो.