मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपासून सतत बातम्यांमध्ये झळकतो आहे. त्याच्यावरती काही लोकांकडून टिकेची झोड उडवण्यात आली आहे. तर काही लोक ती त्याची मर्जी म्हणत त्याच्या न्यूड फोटोशूटचं (Ranveer Singh Photoshoot) समर्थन करत आहेत. यावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत असताना यात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात (Mumbai Police) तक्रार दाखल झाली आहे. मात्र पोलिसांनी यामध्ये अद्याप या FIR दाखल केलेला नाही. मात्र तक्रार दाखल झाल्याने आता हे न्यूड फोटोशूटचं प्रकरण रणवीर सिंगला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरूनच समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही रणवीर सिंगवर सरकून टीका केली होती.
Complaint registered against actor Ranveer Singh in Mumbai’s Chembur Police Station for posting nude pictures on his Instagram account. Police have yet to register an FIR.
(file photo) pic.twitter.com/B0G38hvave
— ANI (@ANI) July 25, 2022
अभिनेता रणवीर सिंह याचं हे वादग्रस्त फोटोशूट आल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी यावर सवाल उपस्थित केले होते. एखाद्या अभिनेत्याचे नग्न फोटो चालतात मात्र मुलींनी त्यांच्या मर्जीने हिजाब घातलेला चालत नाही. हे आपण कोणत्या सांस्कृतिककडे चाललो आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच इतरही अनेक लोकांनी यावर टीका केली होती.
मात्र बॉलीवूड मधील काही मंडळी ही रणवीर सिंहच्या समर्थनार्थ उभा राहिली होती. त्याला योग्य वाटतं ते त्यानं केलं. तो त्यात कम्फर्टेबल असेल तर त्याने ते करावं. त्याने काय करावं आणि काय न करावं हे सांगणारे आपण कोण? अशी भूमिका अनेक बॉलीवूडच्या मंडळींनी घेतली होती. तसेच अनेक जणांनी या प्रकरणावर बोलण्यावर नकार दिला होता. मात्र देशभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत होत्या आणि आता हे प्रकरण थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण रणवीर सिंहला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. रणवीर सिंह त्याच्या पावर पॅक एनर्जीमुळे आणि जबरदस्त अभिनयामुळे नेहमीच चर्चात असतो, मात्र हे फोटोशूट जरा वेगळाच विषय ठरताना दिसत आहे.