Drugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच माहिती लीक करत आहे असं सिद्ध होईल : सचिन सावंत

एनसीबीच्या कार्यालयातील गुप्त चौकशीचे मिनिटा-मिनिटाचे तपशील माध्यमांमध्ये येत आहेत. यावरुनच सचिन सावंत यांनी एनसीबीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत (NCB office investigation information leak).

Drugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच माहिती लीक करत आहे असं सिद्ध होईल : सचिन सावंत
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 4:56 PM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात समोर आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटनंतर चौकशीत अनेक अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. त्यानंतर एनसीबीकडून संबंधित अभिनेत्रींना समन्स पाठवण्यापासून चौकशी आणि नंतर अटकेचीही कारवाई होत आहे. मात्र, या सर्व घटनाक्रमांमध्ये एनसीबीच्या कार्यालयातील गुप्त चौकशीचे मिनिटा-मिनिटाचे तपशील माध्यमांमध्ये येत आहेत. यावरुनच महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी एनसीबीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत (Sachin Sawant raise question on how NCB office investigation information leak).

सचिन सावंत यांनी एनसीबीच्या कार्यालयातील गुप्त चौकशीचे मिनिटा-मिनिटाचे तपशील माध्यमांमध्ये कसे येत आहेत? असा प्रश्न विचारला आहेत. तसेच एनसीबीने समोर येऊन माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चेचं खंडन करावं, असं आवाहन केलंय. एनसीबीने असं न केल्यास गुप्त चौकशीची माहिती एनसीबीकडूनच हेतुपूर्वक पसरवली जात आहे, असं मानलं जाईल, असा इशाराही सचिन सावंत यांनी दिला. त्यांनी याबाबत ट्विट करत आपली भूमिका मांडली.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “माध्यमांमध्ये एनसीबीच्या ऑफिसमध्ये काय सुरु आहे याबद्दल मिनिटा-मिनिटाची चर्चा सुरु आहे. एनसीबीने समोर येऊन या सर्व चर्चा किंवा दाव्यांचं खंडन करावं. जर त्यांनी तसं केलं नाही तर एनसीबीकडून हेतुपूर्वक ही माहिती लीक केली जात आहे असं समजलं जाईल. जर हे खरं ठरलं तर फार दुर्दैवी असेल.”

दरम्यान, प्रसिद्ध निर्माता करण जोहरने देखील माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांवर आणि त्यात करण्यात येणाऱ्या दाव्यांवर आक्षेप घेतला आहे. तसेच माध्यमांनी हे न थांबवल्यास त्यांच्यावर नाईलाजाने कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही करण जोहरने दिला आहे.

संबंधित बातम्या :

एनसीबीकडून 59 ग्रॅम गांजाचा गाजावाजा, पण भाजप कार्यकर्त्याकडील 1200 किलो गांजाकडे दुर्लक्ष : सचिन सावंत

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड : सचिन सावंत

कंगना भाजपची कठपुतली, महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा भाग : सचिन सावंत

संबंधित व्हिडीओ :

Sachin Sawant raise question on how NCB office investigation information leak

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.