‘छावा’ सिनेमाच्या यशानंतर रश्मिका वादाच्या भोवऱ्यात, काँग्रेस अमदाराचा दावा, लवकरच ‘ते’ पुरावे करणार सादर

| Updated on: Mar 05, 2025 | 1:43 PM

Chhaava fame Actress Rashmika Mandanna: 'छावा' सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या अडचणीत मोठी वाढ, काँग्रेस आमदारासह अनेकांना साधला अभिनेत्रीवर निशाणा, लवकरच पुरावे सादर करण्याचा केलाय दावा

छावा सिनेमाच्या यशानंतर रश्मिका वादाच्या भोवऱ्यात, काँग्रेस अमदाराचा दावा, लवकरच ते पुरावे करणार सादर
Follow us on

Chhaava fame Actress Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसुबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. सर्वत्र सिनेमाचा बोलबाला असताना रश्मिका मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिल्याचा आरोप रश्मिकावर आहे. ज्यामुळे चाहते आणि राजकीय व्यक्तींनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. शिवाय अभिनेत्री विरोधात लवकरच पुरावे सादर करणार असल्याचा दावा देखील एका आमदाराने केला आहे.

सतत विरोध होत असताना, रश्मिका मंदाना हिच्या जवळच्या सूत्रांनी आपली बाजू मांडत एक अधिकृत वक्तव्य जारी केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘रश्मिकाने बेंगळुरू फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आणि त्याबद्दल आणि भाषेबद्दल अपमानास्पद विधानं केल्याचा आरोप करणाऱ्या या काही बातम्या आहेत. त्या पूर्णपणे खोट्या असून त्यात तथ्य नाही.

 

 

रश्मिकाच्या टीमने आरोपांचे खंडन केल्यानंतर, कर्नाटक काँग्रेसचे आमदार रवी गनिगा यांनी सांगितले की, त्यांच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. आमदार म्हणाले, ‘हे रश्मिका हिचं वक्तव्य नाही, तिया टीमचं वक्तव्य आहे. पुरावे सादर करु ज्यामध्ये रश्मिका हिला बेंगळुरू फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यास निमंत्रित केलं होतं. पण ती आली नाही. अभिनेत्रीला अनेकदा बोलावण्यात आलं. पण तिने कोणतं वैध कारण न देता नकार दिला.’

‘रश्मिकाने केल्या कन्नड भाषेचा अपमान…’

रवी गनिगा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, ‘रश्मिका हिने ‘किरिक पार्टी’ मधून करीयरची सुरुवात केली. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही अभिनेत्रीला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येण्याचे आमंत्रण दिले तेव्हा तिने नकार दिला. आमच्या एका आमदार मित्राने त्यांच्या घरी 10-12 वेळा भेट दिली, पण तिने नकार दिला. शिवाय रश्मिकाने कन्नड भाषेचा देखील अपमान केला. असं केल्यामुळे अभिनेत्रीला धडा शिकवायला नको का?’ असा प्रश्न देखील उपस्थित केला.