Wedding Card : गौहर खान आणि जैद दरबारच्या लग्नाचं क्रिएटिव्ह इन्विटेशन कार्ड, पाहा व्हिडीओ
लग्नाच्या 6 दिवस आधी गौहरनं आपल्या लग्नाचं कार्ड शेअर केलं आहे.(Creative Invitation Card for Gauhar Khan and Jaid Darbar's Wedding)
मुंबई : गौहर खान आणि जैद दरबारच्या लग्नाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. दोघंही येत्या 25 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या 6 दिवस आधी गौहरनं आपल्या लग्नाचं कार्ड शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये या दोघांची लॉकडाऊनमधील स्टोरी दाखवण्यात आली आहे. दोघं एकमेकांच्या प्रेमात कसे पडले आणि त्यांनी कसं प्रपोज केलं हे सगळं या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. ‘जब वी मेट’ असं कॅप्शन देत गोहरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ दोन कॅरिकेचर्सनं सुरू होतो, दोघं जणं ऑटोमधून दाखवले आहेत अर्थातच हे दोघं गौहर आणि जैद आहेत. त्यानंतर, हे दोघं शॉपिंग मॉलमध्ये वस्तू खरेदी करताना दिसतात आणि त्यानंतर दोघांनी फोनवर बोलण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनमुळे दोघेही पार्किंग गॅरेजमध्ये रोमँटिक डेटवर जात असत. सोबतच या व्हिडीओमध्ये जैदनं गौहरला कसं प्रपोज केलं ते दाखवण्यात आलं आहे. या दोघांची लव्ह स्टोरी एकदम अनोखी आहे.
शुक्रवारी गौहर खान आणि जैद दरबारला मुंबईतील मनीष मल्होत्रा यांच्या शोरुमच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. हे दोघं लग्नाचे ड्रेस ट्राय करण्यासाठी शोरुममध्ये पोहोचले होते.
गौहरनं नुकतेच एक पोस्ट शेअर करुन आपल्या लग्नाची घोषणा केली. ‘आम्ही लग्न करणार आहोत हे सांगून आम्हाला खूप आनंद होतोय. आताची परिस्थिती लक्षात घेता आम्ही हा मोठा दिवस आमच्या कुटुंबाच्या उपस्थितीत साजरा करणार आहोत’. असं कॅप्शन देत तिनं ही पोस्ट शेअर केली होती.
गौहर खान आणि जैद 25 डिसेंबर रोजी मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये लग्न करतील. त्यापूर्वी 2 लग्नाचे बाकी कार्यक्रम होणार आहेत.
View this post on Instagram
जैदच्या लग्नावर वडील इस्माईल दरबार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘आम्हाला त्यांच्या नात्याबद्दल काही अडचण नाही. या नात्यास आम्ही आधीच सहमती दिली आहे. मुलांना जे करायचे आहे, ते त्यांनी करावे. आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत.’ अद्याप जैद आणि गौहर यांनी त्यांच्या लग्नाच्या तारखेची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.