Natasa Stankovic- Hardik Pandya: नताशापासून विभक्त झाल्यानंतर हार्दिकने साजरा केला पहिला वाढदिवस, म्हणाला; माझ्या चुका…

Natasa Stankovic- Hardik Pandya : एकेकाळी नताशा स्टॅनकोव्हिक आणि हार्दिक पंड्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या चार वर्षांच्या आतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगाही आहे.

Natasa Stankovic- Hardik Pandya: नताशापासून विभक्त झाल्यानंतर हार्दिकने साजरा केला पहिला वाढदिवस, म्हणाला; माझ्या चुका...
हार्दिक पंड्या -नताशा स्टॅनकोव्हिकImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 11:56 AM

प्रख्यात क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री स्टॅनकोव्हिक यांन काही महिन्यांपूर्वीच विभक्त होण्याची घोषणा केल्याने अनेकांना मोठा धक्का बसला. त्यापूर्वी बराच काळ त्यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरू होती, मात्र तरीही वाद मिटवून ते पुन्हा एकत्र येतील अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण जुलै महिन्यात त्या दोघांनी आपण विभक्त होत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ माजली. त्यानंतर नताशा तिच्या माहेरी गेली होती. काही दिवसांनी भारतात परत आली होती. त्यांचा मुलगा अगस्त्य याच्यासोबत हार्दिकने वेळही घालवला. आता हार्दिक पंड्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. घटस्फोटानंतर हार्दिकने 11 ऑक्टोबरला त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करतानाच हार्दिकने पोस्टही लिहील आहे.

विभक्त झाल्यानंतरही नताशा -हार्दिक त्यांच्या मुलाचे को-पॅरेंटिंग (सह-पालकत्व) करत आहेत. 11 ऑक्टोबर रोजी हार्दिकचा वाढदिवस असतो. त्याचेच काही फोटो हार्दिकने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून एक मेसेजही लिहीला आहे.या फोटोंमध्ये हार्दिक केक कापताना, दिलखुलासपणे हसताना दिसत आहे. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.पण काही चाहते मात्र नताशा आणि त्या दोघांचा मुलगा अगस्त्य या दोघांना मिस करत आहेत.

हार्दिकने लिहीला मेसेज

“ हे वर्ष चढउतारांनी भरलेले आहे. वाढदिवस हा केवळ चिंतन करण्याची वेळ नाही तर सकारात्मकतेने पुढे जाण्याचीही वेळ आहे. मी सर्व शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी कृतज्ञ आहे .आणि माझ्या चुकांमधून शिकण्यासास, पुढे जाण्यास तयार आहे. तुमच्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद, मी या नवीन वर्षात नवीन प्रेरणा आणि भरपूर प्रेम घेऊन पुढे जात आहे” असे हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहीले आहे.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते हार्दिक – नताशा

नताशा आणि हार्दिक यांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं. गेल्या वर्षी नताशाने हार्दिकला वाढदिवसाच्या रोमँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेत्रीने हार्दिकसोबतच्या तिच्या सुंदर क्षणांचा व्हिडिओ शेअर केला होता. हॅपी बर्थडे माय लव्ह, असेही तिने पोस्टमध्ये लिहीले होते. तर त्यापूर्वी 4 मार्च 2023 रोजी नताशाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने त्या दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या लग्नाची मेहंदी, हळद, लग्नसोहळ असे सर्व क्षणांचे फोटो त्यामध्ये होते. त्याने तिला शुभेच्छा देत सुंदर कॅप्शनही लिहीली होती.

पहिल्या नजरेत जडलं प्रेम

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या एका नाईट क्लबमध्ये भेटले. हार्दिकला पहिल्या नजरेतच नताशा आवडली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2020 मध्ये या जोडप्याने गुपचूप लग्न केले होते आणि 2 महिन्यांतच त्याच्या मुलाचा अगस्त्यचा जन्म झाला. तर फेब्रुवारी 2023 मध्ये या जोडप्याने रितीरिवाजांनुसार पुन्हा लग्न केले. मात्र लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.