मुंबई : चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलच्या सोळाव्या मोसमातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. रविंद्र जडेजाने निर्णायक क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे सीएसके चॅम्पियन ठरली. डकवर्थ नियमानुसार चेन्नईला विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं आव्हान मिळालं होतं. शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून चेन्नईने हे आव्हान पूर्ण केलं. रविंद्र जडेजा या विजयाचा शिल्पकार ठरला. दोन बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना त्याने एक सिक्स आणि एक फोर ठोकला. चेन्नईच्या या विजयावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत नेहमीच क्रिकेटसाठीची क्रेझ पहायला मिळते. त्यामुळे सीएसकेवर सध्या सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान हे अहमदाबादमध्ये सामना पाहण्यासाठी गेले होते. स्टेडियमवरील व्हिडीओ पोस्ट करत विकीने लिहिलं, ‘बदले तेरे माही, लेके जो कोई सारी, दुनिया भी देदे अगर..तो किसे दुनिया चाहिए.’ या पोस्टमध्ये त्याने एम. एस. धोनी, रविंद्र जडेजा आणि गुजराज टायटन्स टीमचंही कौतुक केलं. तर अभिनेता रणवीर सिंगने रविंद्र जडेजासाठी खास ट्विट केलं. ‘अप्रतिम खेळी आणि अप्रतिम फायनल’ असं लिहित त्याने जडेजाचे फोटो पोस्ट केले आहेत. एखाद्या परीकथेप्रमाणेच मॅचचा शेवट झाला, असं अभिनेता रितेश देशमुखने लिहिलं.
RAVINDRASINH JADEJA !!!!!
OH MY GODDDDDDDDDDDDDD
? ???????#CSKvsGT #IPLOnStar @StarSportsIndia @imjadeja @ChennaiIPL ?WHAT A FINISH !!!! WHAT A FINAL !!!!! #RavindraJadeja #Jadeja #Jaddu #IPL2023Final @IPL #ChennaiSuperKings pic.twitter.com/PjJO1P2UxO
— Ranveer Singh (@RanveerOfficial) May 29, 2023
Fairy tale finish @imjadeja – take a bow !!! pic.twitter.com/YF8LWQOEJW
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 29, 2023
Congratulations mere bhai @msdhoni @imjadeja @ChennaiIPL for an amazing victory.
Well played @gujarat_titans ? #IPL2023Finals #GTvCSK pic.twitter.com/wn7IhjryIf— sonu sood (@SonuSood) May 29, 2023
What a match what a final @imjadeja killed it ??
Congratulations@msdhoni #ChennaiSuperKings
#ipl ? pic.twitter.com/ku8kmrqxAX— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) May 29, 2023
गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 214 धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी आधी 215 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाल्याच्या 3 बॉलनंतर पावसाची एण्ट्री झाली. पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 ओव्हर्समध्ये विजयासाठी 171 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. हे आव्हान चेन्नईने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. चेन्नईने पहिल्यांदा 2010 मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 अशा एकूण 5 वेळा हा दमदार कारनामा केला आहे. चेन्नईने यासह मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मुंबईनेही 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.