‘ढगाला लागली कळ’चं नवं व्हर्जन, बाप्पाच्या आगमनापूर्वी रितेश देशमुखचं गाणं

बॉलिवूड सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी नेहमी पंजाबी गाण्यांची निवड केली जाते. मात्र, पहिल्यांदाच कुठल्या हिंदी सिनेमाच्या प्रमोशनसाठी मराठी गाण्याचं रिमिक्स करण्यात आलं आहे.

'ढगाला लागली कळ'चं नवं व्हर्जन, बाप्पाच्या आगमनापूर्वी रितेश देशमुखचं गाणं
Follow us
| Updated on: Aug 27, 2019 | 6:39 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘ड्रीम गर्ल’साठी चर्चेत आहे. नेहमी वेगवेगळ्या विषयांवर आणि वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे करणाऱ्या आयुष्यमानचा हा सिनेमाही वेगळा आणि अनोखा आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. सिनेमाचा ट्रेलर आयुष्यमानच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे. आयुष्यमानचे चाहते त्याला आता नव्या आणि अनोख्या अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. ‘ड्रीम गर्ल’मधील ‘राधे राधे’ हे गाणं सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. मात्र, आता आयुष्मान पहिल्यांदा मराठी गाण्याच्या रिमिक्सवर थिरकताना दिसणार आहे.

‘ड्रीम गर्ल’ या सिनेमासाठी मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार दादा कोंडके यांच्या सुपरहिट ‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याचं रिमिक्स करण्यात आलं आहे. यामध्ये आयुष्मान आणि अभिनेत्री नुसरत भारुचा यांनी जबरदस्त डान्स केला आहे. आयुष्यमान मराठी गाणं करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात आयुष्यमान आणि नुसरतसोबतच अभिनेता रितेश देशमुखही दिसणार आहे.

‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन गायिका ज्योतिका, गायक मिका सिंग आणि मीत ब्रोज यांनी म्हटलं आहे. यामध्ये आयुष्यमान खुराना आणि नुसरतचा मराठी लूक पाहायला मिळत आहे. बॉलिवूड सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी नेहमी पंजाबी गाण्यांची निवड केली जाते. मात्र, पहिल्यांदाच कुठल्या हिंदी सिनेमाच्या प्रमोशनसाठी मराठी गाण्याचं रिमिक्स करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्यमान खुरानाने त्याच्या ‘ड्रीम गर्ल’ सिनेमात एका अनोखा आणि मजेशीर विषय मांडला आहे. त्यामुळे त्याचे चाहते मोठ्या उत्सुकतेने त्याच्या या सिनेमाची वाट पाहत आहेत. या सिनेमात आयुष्यमान आणि नुसरतसोबतच अन्नू कपूर, विजय राज, मनजोत सिंग, निधी बिष्ट, राजेश शर्मा, अभिषेक बॅनर्जी आणि राज भंसाली यांसारख्या बड्या कलाकारांची सेना आहे. हा सिनेमा राज शांडिल्य यांनी दिग्दर्शित केला आहे. तर शोभा कपूर, एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘ड्रीम गर्ल’ हा सिनेमा 13 सप्टेंबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडीओ :

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.