Maharashtrachi Hasyajatra: ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरे; ठाण्यातील चाळीला दिले महाराष्ट्राची हास्यजत्रामधील दत्तू मोरेचे नाव
दत्तूचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तो राहत असलेल्या या चाळीचा हा व्हिडिओ आहे. तो राहत असलेल्या चाळीला दत्तू मोरे हे नाव दिल्यानंतर त्याने चाळीतील सर्व रहिवाशांचे आभार मानले आहेत. तसेच तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकलो असं दत्तू चाळकऱ्यांना म्हणाला.
मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कॉमेडी शो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. या कॉमेडी शो प्रमाणेच यातील कलाकार देखील चांगलेच लोक्परिय होत आहेत. यातीलच एक कलाकार आहे ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरे. ठाण्यातील एका चाळीला दत्तू मोरेचे(Dattu More) नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे दत्तू मोरे याच चाळीत राहतो. त्याच्या चाळीतील सर्व रहिवाशांनी तो राहत असलेल्या चाळीला त्याचेच नाव देत त्याचा अनोखा सन्मान केला आहे.
आपल्या देशातच काय परदेशातही विविध गार्डन, तसेच अनेक ठिकाणांना महा पुरषांची नावे सरकारी यंत्रणांकडून दिली जातात. ठाण्यात मात्र, एका चाळीतील रहिवांशी त्यांच्या चाळीचे नाकरण करत येथे राहत असलेल्या कलाकाराचे नावचं या चळीला दिले आहे. दत्तू मोरे जेथे राहतो त्या चाळीलाच त्याचे नाव देण्यात आले आहे.
दत्तूचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तो राहत असलेल्या या चाळीचा हा व्हिडिओ आहे. तो राहत असलेल्या चाळीला दत्तू मोरे हे नाव दिल्यानंतर त्याने चाळीतील सर्व रहिवाशांचे आभार मानले आहेत. तसेच तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकलो असं दत्तू चाळकऱ्यांना म्हणाला.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील कलाकार आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमाचा मोठा चाहता वर्ग आहे. समीर चौघुले (Samir Choughule), विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे,गौरव मोरे आणि प्रसाद खांडेकर हे कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) करते. अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) आणि अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) हे या शोचे परीक्षक आहेत.