Dawood Ibrahim | फक्त दाऊद सोबतच्या एका फोटोमुळे ‘या’ अभिनेत्रीच संपलं करिअर

| Updated on: Dec 18, 2023 | 11:04 AM

Dawood Ibrahim | दाऊदच्या प्रेमात पडण्याची मोठी किंमत चुकवावी लागली. गुन्हेगारी विश्वाबरोबरच बॉलिवूडमध्ये दाऊद इब्राहिमच्या नावाची मोठी दहशत होती. या दहशतीमुळे अनेकांना दाऊदसमोर नमतं घ्याव लागलं. दाऊद इब्राहिम कराचीच्या हॉस्पिटलमध्ये आता अखेरच्या घटका मोजतोय.

Dawood Ibrahim | फक्त दाऊद सोबतच्या एका फोटोमुळे या अभिनेत्रीच संपलं करिअर
Mumbai Underworld don Dawood Ibrahim
Follow us on

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दबदबा फक्त गुन्हेगारी विश्वापुरता मर्यादीत नव्हता, बॉलिवूडमध्येही त्याची दहशत होती. बॉलिवूडचे स्टार्स, निर्मात्यांकडून दाऊद इब्राहिम पैसे उकळायचा. पुढे जाऊन दाऊदने काही चित्रपटांना फायनान्स केला. बॉलिवूडमध्ये दाऊदची दहशत इतकी होती की, निर्माते त्याच्या मर्जीने हिरो, हिरॉइन्सना चित्रपटात कास्ट करायचे. बॉलिवूडचे अनेक कलाकार दाऊदच्या पार्ट्यांना हजेरी लावायचे. त्याचे व्हिडिओ देखील वेळोवेळी समोर आले आहेत. दाऊदच नाव बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडल गेलं. 90 च्या दशकात मुंबईत दाऊद इब्राहिमची दहशत होती. या दहशतीमुळे अनेकांना दाऊदसमोर नमतं घ्याव लागलं. बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींसोबत दाऊद इब्राहिमच नाव जोडलं गेलं. त्यांच्या सूरस प्रेमकथांची चर्चा मीडियामध्ये रंगली. काही अभिनेत्रींनी दाऊद सोबत नाव जोडल जातय, त्यात अजिबात संकोच बाळगला नाही. त्या सार्वजनिक ठिकाणी दाऊदसोबत उपस्थित राहिल्या. त्याची मोठी किंमत या अभिनेत्रींना चुकवावी लागली.

प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्यामुळे 90 च्या दशकात बॉलिवूडला अशीच एक सौंदर्यवान अभिनेत्री मिळाली. तीच नाव होतं मंदाकिनी. ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातून मंदाकिनीला राज कूपर यांनी लॉन्च केलं. मंदाकिनीच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली. मंदाकिनी दिसायला खूपच सुंदर होती. 1985 साली आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटामुळे मंदाकिनी रातोरात स्टार बनली.

प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला तिला आपल्या चित्रपटात घ्यायच होतं

मंदाकिनीच्या सौंदर्याची जादू अशी होती की, त्यावेळी प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला तिला आपल्या चित्रपटात घ्यायच होतं. मंदाकिनी नावाची एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आलीय, तिच्या सौंदर्याची चर्चा दाऊद पर्यंत पोहोचली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सुद्धा मंदाकिनीवर भाळला. हळूहळू दाऊदने मंदाकिनीबरोबर संपर्क वाढवला. मीडियामध्ये दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सुरु झाली. दाऊद बरोबर नाव जोडल गेल्याने मंदाकिनीला फायद्यापेक्षा तोटा जास्त झाला. मंदाकिनीची चित्रपट सृष्टीतील कारकिर्द उतरणीला लागली.

दाऊदला ती हिरॉइन इतकी आवडायची की, तिच्यासाठी….

मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिमच्या प्रेमसंबंधांची चर्चा 1994 मध्ये सुरु झाली. त्यावेळी मंदाकिनीचा दाऊद सोबतचा दुबईच्या क्रिकेट स्टेडियममधील एक फोटो समोर आला. या फोटोने एकच खळबळ उडवून दिली. हा फोटो समोर येण्याच्या एकवर्ष आधीच मुंबईत साखळी बॉम्बस्फोटाची मालिका झाली होती. दाऊद इब्राहिम मुख्य आरोपी होता. या फोटोमुळे मंदाकिनीबद्दलच अनेकांच मत बदलल. मंदाकिनी दाऊदच्या जवळ असल्याच बोलल जाऊ लागलं. दाऊदला मंदाकिनी इतकी आवडायची की, तिला चित्रपट मिळवून देण्यासाठी तो निर्मात्यांना धमकी द्यायचा. हळूहळू मंदाकिनीला चित्रपट मिळण बंद झालं. परिणामी 1996 साली तिने चित्रपट सृष्टीला रामराम केला.