Deepika Padukone : दीपिका-रणवीरला ‘कन्या’रत्न, कशी असेल लाडक्या लेकीची पर्सनॅलिटी ?
September Born Girl Personality: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलींची पर्सनॅलिटी कशी असते, त्यांचे गुण काय असतात जाणून घेऊया..
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सणाचा उत्साह, आनंद सर्वत्र पसरला आहे. याच गणेशोत्सवादरम्यान बॉलिवूडमध्येही आनंदाचं वातावरण आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पडूकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा बनले आहेत. अभिनेत्रीने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिक ही गणेश चतुर्थीच्या दिवशी, शनिवारी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. काल , म्हणजेच रविवारी 8 सप्टेंबर रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झालं. रणवीर-दीपिकाच्या मुलीचा जन्म सप्टेंबरमधला आहे. या महिन्यांत जन्मलेल्या मुलींची पर्सनॅलिटी कशी असते, त्यांचे गुण काय असतात जाणून घेऊया..
सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांचे गण म्हणजे – प्रामाणिक वागणं, ओपन माईंडेड व्यक्तीमत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कशीही परिस्थिती असली तर प्रामाणिकपणावर ठाम राहण्याचा आत्मविश्वास.
पुस्तकं खूप आवडतात
सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांना पुस्तकं खूप आवडतात. त्यांना वाचनाची आवड असते आणि ते नेहमी पुस्तके वाचताना किंवा चर्चा करताना दिसतात. जर त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर असे लोक व्यवसायाने वकील किंवा न्यायाधीश बनतात.
सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुली असतात मेहनती
ज्या व्यक्ती सप्टेंबर महिन्यात जन्माला येता, त्या कधीच कोणतही काम करणं टाळत नाहीत. ते लोक खूप मेहनती असतात. एखादं काम हाथी घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय ते थांबतच नाहीत. एवढंच नव्हे तर ते मेहनती लोकांचा खूप आदर, सन्मानही करतात.
प्रेमळ असतात पण…
सप्टेंबरमध्ये जन्मलेली मुले प्रेमळ आणि इतरांची काळजी घेणारी असतात. इतरांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. पण जर तुम्ही सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या एखाद्या व्यक्तीशी गैरवर्तन केले तर त्यांच्याकडून कधीही मदतीची अपेक्षा करू नका. ते क्षमाशील वाटू शकतात, परंतु ते कधीही कोणतीही गोष्ट विसरत नाहीत.
सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुलींसाठी कोणते अक्षर शुभ ?
आता सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुलींच्या शुभ नावांबद्दल बोलूया. ‘त’ अक्षराने नाव ठेवणे शुभ असते. तुम्ही तनिष्का, तेजस्वी, तनिषा, त्रिशा किंवा तमन्ना हे नाव निवडू शकता.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)