दीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) शनिवारी (26 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) चौकशी (Interrogation) करण्यात आली. एनसीबीच्या पाच अधिकाऱ्यांनी दीपिकाची चौकशी केली. साडेपाच तास चाललेल्या या चौकशी दरम्यान दीपिका तीनवेळा रडली.

दीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले
दीपिका आणि करिश्माची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 10:56 AM

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) शनिवारी (26 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) चौकशी (Interrogation) करण्यात आली. एनसीबीच्या पाच अधिकाऱ्यांनी दीपिकाची चौकशी केली. साडेपाच तास चाललेल्या या चौकशी दरम्यान दीपिका तीनवेळा रडली. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी तिला चांगलेच खडसावल्याचे कळते आहे. रडून भावनिक दबाव आणू नये, असे एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिकाला सांगितले (Deepika Padukone cried 3 times during NCB interrogation).

चौकशीत दीपिकाने ड्रग्ज चॅट (Drug Chat) केल्याची कबुली दिली आहे. हे संभाषण दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) यांच्या दरम्यान झाले आहे. मात्र, दीपिकाने ड्रग्ज सेवन केल्याचे अमान्य केले आहे.

चौकशी दरम्यान दीपिकाचा फोन जप्त

दीपिका शनिवारी (26 सप्टेंबर) सकाळी पावणे दहा वाजता, गेट वे ऑफ इंडिया येथील एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली होती. त्यानंतर बरोबर 10 वाजता तिची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशी सुरू होण्यापूर्वी एनसीबीने तिचा फोन काढून घेतला होता. त्यामुळे तिला चौकशी सुरू असेपर्यंत कुणाशीही फोनवरून संवाद साधता आला नाही. दीपिकाची मॅनेजर करिश्माही 10 वाजता एनसीबी कार्यालयात दाखल झाली होती. दोघींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात आली.

पाच अधिकाऱ्यांकडून चौकशी

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह, एकूण पाच अधिकाऱ्यांनी दीपिकाची चौकशी केली. या दरम्यान, एनसीबी गेस्ट हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मीडियाने गर्दी करू नये म्हणून गेस्ट हाऊसबाहेर बॅरेकेड्सही लावण्यात आले होते (Deepika Padukone cried 3 times during NCB interrogation).

बॉलिवूडशी संबधित असलेले ड्रग्ज तस्कर पाहता, अधिक सखोल चौकशी केली जाणार असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चौकशी दरम्यान नोंदविण्यात आलेले जबाब न्यायालयाकडे सुपूर्द करणार असल्याचे, एनसीबी उपमहासंचालक एम.ए जैन यांनी म्हटले आहे.

पुन्हा चौकशी होण्याची शक्यता

एनसीबी चौकशी दरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान यांनी ड्रग्ज सेवन केल्याचे अमान्य केले आहे. असे असले तरी एनसीबीने या अभिनेत्रींना क्लीन चीट देण्यास नकार दिला आहे. पुन्हा एकदा एनसीबी या अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या एनसीबीने भारतीय पुरावा अधिनियमांतर्गत दीपिका, करिश्मा, रकुल, श्रद्धा, सारा, जया साहा आणि सिमॉन खंबाटा यांचे फोन जप्त केले आहेत.

(Deepika Padukone cried 3 times during NCB interrogation)

संबंधित बातम्या :

दीपिकाची चौकशी संध्याकाळपर्यंत चालणार; ‘हा’ मराठमोळा अधिकारी करणार तपास

सारा अली खानही घरी नाही; एनसीबी कार्यालयात दीड तास उशिराने पोहोचणार

Drugs Case LIVE | दीपिकाची तासाभरापासून चौकशी सुरु, सारा आणि श्रद्धा चौकशीसाठी पोहोचलेल्या नाहीत

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.