सुब्रमण्यनवर संतापून ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ म्हटलेली दीपिकाही गेलीये एका वाईट परिस्थितीतून

90 तास काम करण्याच्या सल्ला दिलेल्या एसएन सुब्रमण्यन यांच्यावर दीपिका पादुकोणकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. दीपिकाने सोशस मीडियावर एक पोस्ट व्हायरल करून त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. या पोस्टवरून ती सुब्रमण्यन यांच्यावर चांगलीच संतापलेली दिसत आहे .

सुब्रमण्यनवर संतापून 'मेंटल हेल्थ मॅटर्स' म्हटलेली दीपिकाही गेलीये एका वाईट परिस्थितीतून
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 4:17 PM

‘लार्सन अँड टुब्रो’ म्हणजेच ‘एल अँण्ड टी’चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांचं ’90 तास काम करा’ यावरून त्यांनी जो सल्ला दिला होता तो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या वाक्यावरून त्यांना चांगलचं ट्रोलही करण्यात आलं आहे. सर्वसामान्यांपर्यंत ते अगदी सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. आता बॉलिवूडची हसीना दीपिका पादुकोणनेही त्यांच्या या वक्तव्यावर संतापून प्रतिक्रिया दिली आहे.

बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या ‘लार्सन अँड टुब्रो’ म्हणजेच ‘एल अँण्ड टी’चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन सध्या देशभरामध्ये चर्चेत आहेत. एसएन सुब्रमण्यन यांनी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासंदर्भात मत व्यक्त केलं होतं. अनेकांनी एसएन सुब्रमण्यन यांनी व्यक्त केलेलं मत फारच चुकीचं असल्याचं अनेकांनी म्हटलं असतानाच आता अभिनेत्री दीपिका पादुकोणनही यावर व्यक्त झाली आहे.

काय म्हणाली दीपिका पादुकोण? अनेकांनी कर्मचाऱ्यांना खासगी आयुष्य आहे की नाही असा सवाल उपस्थित केला आहे. या साऱ्यादरम्यान दीपिका पादुकोणनेही आपलं मत सोशल मीडियावरुन व्यक्त केलं आहे. “एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीने असं बोलणं फारच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन दिली आहे. दीपिकाने यावर ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ म्हणजेच मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे, असा हॅशटॅगही प्रतिक्रिया देताना वापरला आहे. दीपिकाच्या पोस्टवरून ती प्रचंड संतापलेली पाहायला मिळत आहे.

‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ दीपिकासाठी मानसिक आरोग्य फार महत्त्वाचं

‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ म्हणणाऱ्या दीपिकासाठी मानसिक आरोग्य फार महत्त्वाचं आहे. कारण ऐकेकाळी तीसुद्धा अशा प्रकारच्या अनुभवातून गेली होती. नैराश्यासोबतच्या तिच्या लढाईबद्दल दीपिका अनेकदा बोलली आहे आणि तिने आत्महत्या करणार असल्याचंही तिने सांगितलं होतं.

देशातील मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दीपिकाने एनजीओची स्थापना केली आहे. दीपिका जेव्हा या सगळ्यातून जात होती, तेव्हा तिच्या आईने तिचे दुःख समजून घेतले आणि तिला या सगळ्यातून मार्ग काढण्यास मदत केली. असंही तिने सांगितले होते.

त्यामुळे एसएन सुब्रमण्यन यांच्या वक्तव्याचा समाचार घेत असताना दीपिकाने आवर्जून ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ हा शब्द वापरला. कारण तिच्यासाठी आजही मेंटल हेल्थ ही आजही महत्त्वाची असल्याचं तिने म्हटलं आहे. एवढच नाही तर ती अनेक मुलाखतींमध्येही आवर्जून ‘मेंटल हेल्थ’बद्दल बोलताना दिसते.

एसएन सुब्रमण्यन यांनी काय वक्तव्य केलं होतं?

एसएन सुब्रमण्यन यांना एका कार्यक्रमादरम्यान ‘लार्सन अँड टुब्रो’ची अब्जावधींची उलाढाल असूनही इथल्या कर्मचाऱ्यांना शनिवारीसुद्धा कामावर का यावं लागतं? असा एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना एसएन सुब्रमण्यन यांनी म्हटलं की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम केलं पाहिजे.

तसेच रविवारी घरी बसून किती वेळ बायकोला पाहत राहणार त्याऐवजी कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केलं पाहिजे असंही मत त्यांनी नोंदवलं होतं. ते म्हणाले होते “मला खंत आहे की मी लोकांना रविवारीसुद्धा कामावर बोलवू शकत नाही. मी त्यांना रविवारीसुद्धा कामावर बोलवू शकतो तर मला नक्कीच आनंद होईल’ असं धक्कादायक उत्तर एसएन सुब्रमण्यन यांनी दिलं होतं. ज्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं

साडेबारा तास काम करावं अशी इच्छा

दिवसाचे 24 तास या हिशोबाने आठवड्यातील सात दिवसांमधील 168 तासांपैकी 90 तास कर्मचाऱ्यांनी काम करावं असं एसएन सुब्रमण्यन यांचं म्हणणं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास कामाचा सहा दिवसांचा आठवडा गृहित धरल्यास दिवसाला साडेबारा तास काम करणं अपेक्षित असल्याचं मत एसएन सुब्रमण्यन यांनी व्यक्त केलं होतं. एसएन सुब्रमण्यन यांच्या या सर्वच वक्तव्यावर दीपिकाने संतापून प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, एसएन सुब्रमण्यन यांच्या प्रतिक्रियेनंतर ‘लार्सन अँड टुब्रो’ने स्पष्टीकरण देताना राष्ट्रनिर्माण हे आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचं अध्यक्षांना सूचित करायचं होतं अशा अर्थाचं विधान केलं आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...