Deepika Padukone : अनंत-राधिकाच्या संगीतमध्ये दीपिकाची चर्चा, जांभळी साडी तयार करायला किती तास लागले ? किंमत किती ?
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोण ही जांभळ्या रंगाची सुंदर साडी परिधान करून आली होती. तिच्यावरच सगळ्या नजरा खिळल्या होत्या. पण तिची ही अप्रतिम साडी किती किमतीची आणि ती तयार करायला किती वेळ लागला ?
‘कल्की 2898 एडी’ चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पडूकोण सध्या बरीच चर्चेत आहे. लवकरच ती आईही बनणार आहे. गेल्या आठवड्यातच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केला ज्यामध्ये जांभळ्या रंगाच्या , अप्रतिम वर्क केलेल्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अंत आणि राधिक मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला जाताना दीपिकाने ही साडी नेसली होती. या सोहळ्यासाठी उद्योग जगतातील नामवंत व्यक्ती तसेच बॉलिवूडमधीलही अनेक कलाकार आले होते. मात्र सर्वांच्या नजरा दीपिकावरच खिळल्या होत्या. अतिशय ग्रेसफुली तिने ही साडी कॅरी केली होती. आणि त्यासोबतचा तिचा लूकही सिंपल पण एलीगंट असा होता. तिच्या या साडीची सोशल मीडियावरही चर्चा होत असून जांभळ्या रंगाची ही साडी पाहून अनेकांना ‘हम आपके है कौन’मधील माधुरी दीक्षितचा लूक आठवला. मात्र या साडीची किंमत किती आणि ती बनवण्यासाठी किती वेळ लागला , हे जर तुम्ही वाचाल तर आश्चर्यचकित व्हाल.
दीपिकाच्या लाखोंच्या साडीने वेधले लक्ष
दीपिका पदुकोणने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. विशेष बाब म्हणजे मॉम टू बी दीपिकाने तिने अनंत आणि राधिकाच्या संगीतसाठी ही जांभळ्या रंगाची साडी नेसली होती आणि यावेळी ती कमाल दिसत होती. कमेऱ्यासमोर सुंदर साडीत फोटो काढताना तिने बेबी बंपही फ्लाँट केले. दीपिका पदुकोणची सुंदर जांभळ्या रंगाची साडी इतकी खास का आहे हे जाणून घेऊया.
View this post on Instagram
दीपिकाची सुंदर जांभळी साडी तौरानीच्या वॉर्डरोबमधील आहे. या साडीचे फॅब्रिक ऑर्गेन्झा आणि जेनी सिल्क आहे. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर हाताने भरतकाम केले आहे. ती तयार करण्यासाठी सुमारे 3,400 तास लागले. या साडीवर मोती, जरी, तार यांची सजावट आहे, त्यामुळे साडीच्या सौंदर्यात भर पडली आहे. एवढेच नाही तर या साडीची किंमत हजारो नाही तर लाखो रुपयांत आहे. दीपिकाने नेसलेल्या या जांभळ्या साडीची किंमत 1 लाख 92 हजार रुपये आहे. तोरानी लेबलच्या या साडील हुकूम की रानी साडी सेट म्हटले जाते. हे त्यांच्या काऊचर कलेक्शन लीला मधील आहे. या साडीवर घातलेल्या मॅचिंग ब्लाऊजची किंमत तब्बल 46,500 रुपये इतकी आहे.
ज्वेलरी कॉम्बिनेशनही होतं कमाल
दीपिकाने या साडीवर डीप नेकलाइन, हाफ-लेन्थ स्लीव्हज आणि क्रॉप्ड हेमसह मॅचिंग ब्लाउज घातला. दागिन्यांमध्ये तिने मोत्यांनी बनवलेला चोकर नेकलेस, मॅचिंग कानातले आणि अंगठी घालून आपला लूक पूर्ण केला.
दीपिका-रणवीर लवकरच होणार आई-बाबा
एकमेकांना 6 वर्षांपेक्षा जास्त काळ डेट केल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने यांनी 2018 साली लग्न केलं.आणि आता लग्नाच्या 6 वर्षानंतर, त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिका-रणवीरने सोशल मीडियावरून ही गुड सर्वांसोबत शेअर केली होती.