KRK: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘टॅग’; करत KRK ने केले खळबळजनक वक्तव्य
केआरकेला त्याच्या जुन्या ट्विटमुळे मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यांने दिवंगत ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. अटकेनंतर त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
कायम वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेला , स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणारा कमाल रशीद खान (Kamal Rashid Khan)सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा आपल्या चित्रविचीत्र ट्विट(Twitter) करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो केआरकेने नुकत्याच केलेल्या ट्विटमुळे तो चर्चेत आला आहे. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादात सापडलेल्या केआरकेने यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) (Rashtriya Swayamsevak Sangh)जॉईन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्याने आपल्या ट्विटरवर ट्विट करत संघप्रमुख मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत मी संघात येण्यास तयार असल्याचे लिहिले आहे. KRK ने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आदरणीय मोहन भागवत जी, RSS ला माझी गरज भासल्यास मी संघात येण्यास तयार आहे.” या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एका ट्विटद्वारे सांगितले होते की, मी लवकरच एका राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे.
Honourable @DrMohanBhagwat Ji, I am ready to join @RSSorg if #RSS needs me. ?? @Dev_Fadnavis
— KRK (@kamaalrkhan) September 19, 2022
त्यामध्ये त्याने लिहिले होते की, ‘मी लवकरच राजकीय पक्षाचा भाग बनण्याचा विचार करत आहे. कारण देशात सुरक्षित राहण्यासाठी अभिनेता नसून नेता बनणे आवश्यक आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी त्यांचे समर्थन केले. एका यूजरने लिहिले की, ‘ तुमच्या स्वतःचा पक्ष काढा , आम्ही तुमच्यासोबत आहोत.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘उशीर झाला आहे.’ याशिवाय अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त करत त्याला विचारले की तू खरंच अभिनेता आहेस का?
I am considering to join a political party soon. क्योंकि देश में सुरक्षित रहने के लिए, नेता होना ज़रूरी है, अभिनेता नहीं!???
— KRK (@kamaalrkhan) September 15, 2022
विशेष म्हणजे केआरकेला त्याच्या जुन्या ट्विटमुळे मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यांने दिवंगत ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. अटकेनंतर त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच वेळी, त्याच्यावर 2021 मध्ये वर्सोवा पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याला नऊ दिवस कोठडीत ठेवल्यानंतर न्यायालयाने दोन्ही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर आला.