‘आईच माझी पहिली प्रेक्षक’, ‘देवमाणूस’मधल्या ‘विजय’ अर्थात एकनाथ गीतेचा प्रवास!
'देवमाणूस’ मालिकेतील सध्या गाजत असलेली व्यक्तिरेखा म्हणजे विजय शिंदे. परभणीचा अभिनेता एकनाथ गीते याने ही व्यक्तिरेखा साकारलीय.

मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण, त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या, अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका (Devmanus Serial) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळताना दिसतेय. ‘देवमाणूस’ मालिकेतील सध्या गाजत असलेली व्यक्तिरेखा म्हणजे विजय शिंदे. परभणीचा अभिनेता एकनाथ गीते (Eknath Geete) याने ही व्यक्तिरेखा साकारलीय. या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली खास बातचीत… (Devmanus Fame Eknath Geete Aka vijay Serial Journey)
विजय या व्यक्तिरेखेसाठी तुझी निवड कशी झाली?
मी मुंबई युनिव्हर्सिटीतून ‘मास्टर्स इन थिएटर आर्ट्स’ हा अभासक्रम पूर्ण केला आहे. या दरम्यान तिथे बऱ्याच नाटकांमध्ये सहभागी झालो होतो. या लॉकडाऊनच्या काळात मी 6 महिने घरी बसून होतो. मुंबई सोडून घरी म्हणजे गावाकडे परभणीला जावे लागले. घरात बसून चिडचिड व्हयला लागली, आणि एक दिवस मला मकरंद गोसावींचा फोन आला की आपण ‘देवमाणूस’ नावाची मालिका करतोय. त्यात विजय नावाची एक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली आणि मी ऑडिशन दिलं, आणि लगेचच २ तासात त्यांचा फोन आला की, तू विजयची भूमिका करतोयस.(Devmanus Fame Eknath Geete Aka vijay Serial Journey)
तू ‘विजय’सारखा आहेस का?
खरंतर 1 टक्का सुद्धा नाही. पण, विजय मधल्या काही गोष्टी नक्की घायला आवडतील. तो खूप स्पष्ट आहे, आयुष्यात सरळ मार्गाने चालणारा आहे. विजय अजिबात खोटा नाहीये, त्याला जर वाटलं की आपलं चुकलंय तर तो सरळ पायापडून माफी मागतो. अशा वेळेला त्याची जी प्रिय गोष्ट आहे, स्वाभिमान याचा देखील तो विचार करत नाही. या त्याच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला आवडतील.
या व्यक्तिरेखेसाठी तू काय तयारी केलीस?
मला जेव्हा कळलं की, विजय मला करायचंय तेव्हा मला खूप आनंद झाला. पण सकारात्मक दबाव आला होता. कारण, याआधी मी अशी भूमिका कधीच केली नव्हती. मग मी स्वतःला 5 प्रश्न विचारले. विजय कोण आहे?, विजय का आहे?, तो कधी आहे?, तो कुठे आहे? आणि तो कसा आहे?, या प्रश्नांची उत्तर शोधत गेलो आणि विजय सापडत गेला. विजय मध्ये राग आहे, माज आहे, श्रीमंतीचा एक मोठेपणा आहे, पुरुषी अहंकार आहे, या सगळ्या निरीक्षणाची विजय साकारताना खूप मदत झाली. (Devmanus Fame Eknath Geete Aka vijay Serial Journey)
चाहत्यांकडून काय प्रतिक्रिया मिळत आहेत?
प्रेक्षकांचा इतका मोठा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. मालिकेच्या 5व्या भागात माझी म्हणजे ‘विजय’ची एंट्री झाली, त्या दिवसापासून सोशल मीडियावर छान छान प्रतिक्रिया मिळायला लागल्या. माझ्यासाठी हे सगळंच नवखं होतं. तरीही आपली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय हे मला त्यांच्या प्रतिक्रियेतून कळले होते. बाहेर पडल्यावर लोक ओळखायला लागले. एकदिवस मी घरी आईला फोन केला आणि छान गप्पा मारत होतो. तेव्हा आई मला बोलली की, मी या आधी जेव्हा तुला टीव्हीवर बघायचे तेव्हा, मला नेहमी वाटायचं की, आपला एकनाथ बोलतोय. पण या वेळेस ना मला वाटतच नाही की मी एकनाथला बघतेय. ती अगदी सहज बोलून गेली. ही माझ्यासाठीची आतापर्यंतची सगळ्यात मौल्यवान प्रतिक्रिया होती. माझी आई 4थी शिकली आहे, तिला अभिनयातले फार काही कळत नाही. पण, माझी आईच माझा पहिला प्रेक्षक आहे.
(Devmanus Fame Eknath Geete Aka vijay Serial Journey)
विठ्ठल अजितकुमारला रेश्माच्या मृतदेहापर्यंत घेऊन जाईल ? #Devmanus #ZeeMarathi pic.twitter.com/4KRaB6xncr
— Zee Marathi (@zeemarathi) October 26, 2020