Dharmendra & sunny Deol | सनी देओलच्या चित्रपटातील ती गोष्ट धर्मेंद्र यांना बिलकूल आवडत नाही, म्हणतात – मजबुरी आहे म्हणून…

| Updated on: Aug 17, 2023 | 2:44 PM

सनी देओल याच्या चित्रपटात असलेले काही संवाद धर्मेंद्र यांना बिलकूल आवडत नाहीत. एका मुलाखतीत त्यांनीच हा खुलासा केला होता.

Dharmendra & sunny Deol | सनी देओलच्या चित्रपटातील ती गोष्ट धर्मेंद्र यांना बिलकूल आवडत नाही, म्हणतात - मजबुरी आहे म्हणून...
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओल (sunny deol) याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धमाल करत आहे. अवघ्या काही दिवसांतच चित्रपट हिट ठरला असून त्याने बॉक्स ऑफीसवरही मोठे यश मिळवले आहे. गदरच्या यशादरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री नादिया खान हिने सनी देओल व धर्मेंद्र (Dharmendra) यांच्याबद्दल एक खुलासा केला आहे.

सनी देओलच्या चित्रपटातील पाकिस्तान विरोधी संवाद धर्मेंद्र यांना आवडत नाहीत. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे. ही फक्त ( अँटी-पाकिस्तानी डायलॉग म्हणणे) एक मजबुरी आहे, नाहीतर मला ते आवडत नाहीत, असे धर्मेंद्र यांचे म्हणणे असल्याचे नादियाने सांगितले.

मात्र ती कोणत्या चित्रपटांबद्दल बोलत आहे, हे नादियाने स्पष्ट केले नाही. एका पॉडकास्टमध्ये नादिया हिने बॉलिवूड अभिनेत्यांच्या मुलाखतीबद्दल सांगितले. बॉर्डर, गदर आणि आता गदर 2 या चित्रपटांत सनी देओल याने काम केले असून, या चित्रपटांची कथा भारत-पाकिस्तान संबंधाच्या आजूबाजूला फिरणारीच आहे. नादियाने धर्मेंद्र यांच्यासोबतच्या फोनवरील संभाषणाबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, धर्मेंद्र यांनी त्यांना यूकेमधून फोन केला होता, माझा तर त्यावर विश्वासच बसत नव्हता. मला वाटलं की कोणीतरी माझी मजा करत आहे. तिने जगभरातील कूल डॅड्सवर एक शो केला आणि त्यात धर्मेंद्र यांचे देखील नाव होते, तेव्हाचा हा किस्सा आहे.

धर्मेंद्र यांनी पाठवली आपली क्लिप

धर्मेंद्र यांच्याशी बोलताना ती त्यांना म्हणाली की, तुमचा मुलगा सनी देओल जेव्हा त्याच्या चित्रपटात पाकिस्तानविरोधी (संवाद) बोलतो तेव्हा मला ते आवडत नाही. आणि त्यावर ते (धर्मेंद्र) काय म्हणाले तुम्हाला माहिती आहे ? ते (धर्मेंद्र) म्हणाले – मलाही हे आवडत नाही. नादियाने त्यांना सांगितले की, पाकिस्तानमध्येही सनी देओलचे बरेच चाहते आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे (अँटी-पाकिस्तानी) संवाद चित्रपटात म्हणू नकोस, असं त्याला सांगा. त्यावर धर्मेंद्र म्हणाले की, सनीलाही असे डायलॉग म्हणायला आवडत नाहीत, पण ही मजबुरी आहे.