Dharmendra | ‘तो’ सीन शूट करताना मला… शबाना आझमींसोबतच्या ‘त्या’ सीनबद्दल धर्मेंद्र यांनी सोडले मौन

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट नुकताच रिलीज झाला. त्यामध्ये अभिनेते धर्मेंद्र यांचा एक लिपलॉक सीनही आहे.

Dharmendra | 'तो' सीन शूट करताना मला... शबाना आझमींसोबतच्या 'त्या' सीनबद्दल धर्मेंद्र यांनी सोडले मौन
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 6:11 PM

Dharmendra Reaction : करण जोहर (Karan Johar) याच्या दिग्दर्शनखाली बनलेला रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपच 28 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यासह धर्मेंद्र (Dharmendra), शबाना आझमी (Shabana Azmi), जया बच्चन (Jaya Bachchan) यांचीही मुख्य भूमिका आहे. मात्र या चित्रपटातील एक सीन पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा एक किसींग सीन आहे. मात्र त्यावर बरेच लोक टीका करत आहेत. आता यावर धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटातील आलिया भट्ट व रणवीर सिंग यांच्या केमिस्ट्रीसोबतच धर्मेंद्र व शबाना आझमी यांच्या कामाचेही खूप कौतुक झाले आहे. चित्रपटात धर्मेंद्र अनेक वर्षांनी शबाना आझमी यांना भेटतात तेव्हा गाणं म्हणतात व त्यांना किस करतात. याच दृश्यावर आता धर्मेंद्र यांनी मौन सोडले आहे.

काय म्हणाले धर्मेंद्र ?

एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी किसींग सीनबद्दल प्रतिक्रिया दिली. ‘ चित्रपटातील माझ्या व शबाना यांच्या किसींग सीनमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे असं मी ऐकलं, ‘ असं धर्मेंद्र म्हणाले. त्यांनी या सीनचे कौतुक केले. मला वाटतं लोकांना याची कल्पना नव्हती, आणि तो सीन अचानक समोर आल्याने त्याचा मोठा प्रभाव पडला. यापूर्वी मी ‘ लाईफ इन ए मेट्रो ‘ चित्रपटात नफीसा अली यांना शेवटचं किस केलं होतं आणि त्या सीनच बरंच कौतुक झालं होतं, असं ते म्हणाले.

धर्मेंद्र यांनी पुढे सांगितलं की, जेव्हा करणने (जोहर) आम्हाला हा सीन ऐकवला तेव्हा मला ते एक्स्पेक्टेड नव्हतं. मात्र आम्ही तो (सीन) समजून घेतला आणि त्यानंतर आम्हाला वाटल की हा सीन असा आहे ज्याची चित्रपटात आवश्यकता, गरज आहे. तो काही जबरदस्ती किंवा उगाचच टाकायचा म्हणून मध्येच टाकलेला सीन नाही, मग मी म्हटलं की हो, मी हा सीन करेन.

वय हा फक्त एक आकडा !

मला असंही वाटत की रोमान्स करण्याचं काही (ठराविक) वय नसतं. वय हा तर फक्त एक आकडा आहे. आणि त्याचा वयाचा विचार न करता, त्याची काळजी न करता दोन लोकं किस करून एकमेकांप्रती असलेलं प्रेम दर्शवू शकतात. हा सीन करताना ना मला ना शबानाला, कोणालाही काही वेगळं किंवा अजब वाटलं नाही कारण, तो (सीन) अगदी छान पद्धतीने शूट करण्यात आला, असंही धर्मेंद्र यांनी नमूद केले.

या चित्रपटाबद्दल धर्मेंद्र म्हणाले, मला असं वाटतं की मी अजून चांगलं काम करू शकलो असतो. पण करणने एक शानदार चित्रपट बनवला आहे, तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. मी त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम केलं पण मला खूप आनंद वाटला. सगळ्याच कलाकारांच काम छान झालंय. रणवीर, आलिया हे दोघेही अगदी सहज अभिनय करतात. चित्रपटात शबाना यांचं काम मस्त झालं आणि जया (बच्चन) यांचही, तिला मी नेहमी गुड्डी म्हणतो. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे लोक तो थिएटरमध्ये जाऊन पाहतील आणि आमच्यावर असाच प्रेमाचा वर्षाव करतील, अशी आशाही धर्मेंद्र यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.