Esha Deol : बॉलिवूडमधील आणखी एक कपल घटस्फोट घेणार ? ईशा देओलची जोरदार चर्चा का ? सत्य…

Esha Deol Bharat Takhtani : ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्यातील तुटलेल्या नात्याबद्दल बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये बरीच गॉसिप सुरू आहे. त्याची सुरुवात Reddit वर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे झाली. या जोडप्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं सांगण्यात येत आहे. कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये दोघंही सध्या एकत्र दिसत नाहीत.

Esha Deol : बॉलिवूडमधील आणखी एक कपल घटस्फोट घेणार ? ईशा देओलची जोरदार चर्चा का ? सत्य...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 7:31 AM

मुंबई | 17 जानेवारी 2024 : गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी विभक्त होत आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिका यांच्या वेगळ्या होण्याच्या चर्चाही बऱ्याच काळापासून सुरू होत्या. नुकतेच सानियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूल शोएबचे सर्व फोटो हटवले. आता बॉलिवूडमधील आणखी एका कपलच्या आयुष्यात सगळं आलेबल नसल्याचे वृत्त समोर आले आहे. बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र आणि ड्रीमगर्ल हेमामालिनी यांची लेक ईशा देओल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी एकमेकांपासून वेगळे झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ईशा आणि भरत हे एक स्ट्राँग कपल म्हणून ओळखले जातात. अनेक इव्हेंट्स, पार्टीजमध्ये ते दोघे नेहमीच एकत्र दिसतात, त्याचे फोटो व्हायरल होता. मात्र गेल्या काही काळापासून असं घडत नाहीये. अशा परिस्थितीत हे जोडपे वेगळे झाल्याचा अंदाज युजर्सनी लावला आहे. या चर्चांमुळे सगळेच हैराण आहेत.

पतीपासून विभक्त होत्ये ईशा देओल ?

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्यातील तुटलेल्या नात्याबद्दल बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये बरीच गॉसिप सुरू आहे. त्याची सुरुवात Reddit वर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे झाली. ईशा- भरतमध्ये सर्व काही आलबेल नाही, असं या पोस्टमध्ये म्हटले होते.अशा परिस्थितीत दोघेही वेगळे झाले आहेत अशी चर्चा आहे. यानंतर यूजर्सच्या लक्षात आले की, गेल्या वर्षी सुरू झालेल्या फेस्टिव्ह सीझनमध्ये ईशा देओल फक्त तिची आई हेमा मालिनीसोबत दिसली होती. आमिर खानची मुलगी आयरा हिच्या रिसेप्शनलाही ईशा तिच्या आईसोबत आली होती.

आईव्यतिरिक्त ईशा देओल तिच्या दोन मुलींसोबतही विविध ठिकाणी दिसली आहे. लहान-मोठ्या कार्यक्रमांमध्ये ईशा एकटीच दिसली. वेगवेगळ्या दिवाळी पार्ट्यांनाही तिने एकटीच हजेरी लावली. याआधी मात्र ती नेहमीच पती भरत तख्तानीसोबत कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये हजेरी लावत होती. एवढेच नाही तर सासू हेमा मालिनी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही भरतने हजेरी लावली नाही. यामुळे या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या अफवांना आणखी उत्तेजन मिळाले.

सत्य काय आहे ?

पण या कपलच्या जवळच्या लोकांनी या बातमीबाबतचे सत्य सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईशा आणि भरतच्या विभक्त होण्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. या जोडप्याने जून 2023 मध्ये त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचा एक रोमँटिक मोनोक्रोम फोटोही शेअर केला आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता. या लग्नात देओल कुटुंबीयांचा आनंद पाहायला मिळाला. आपल्या मुलीची पाठवणी करताना धर्मेंद्र यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ईशा आणि भरत यांना राध्या आणि मिराया नावाच्या दोन मुली आहेत.

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.